Tuljabhavani Mandir Saam tv
महाराष्ट्र

Tuljabhavani Mandir : मठाच्या जमिनीवरून तुळजाभवानी संस्थान, पुजाऱ्यांमध्ये वाद पेटण्याची चिन्ह; सोलर प्रकल्पातून येणारा मोबदला मठाला देण्यास विरोध

Dharashiv News : तुळजाभवानी मंदिरात विविध सेवा देण्यासाठी निजाम सरकारने मठाला हजारो एकर जमीन दिली आहे. तर तुळजाभवानी संस्थानच्या जमिनीवर १३५० कोटींच्या गुंतवणुकीतून ३०० मेगावॅटचा सोलार प्रकल्प उभारला जाणार आहे

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: तुळजाभवानी मंदिरात विविध सेवा पुरवण्यासाठी मंदिर संस्थांनच्या मालकीची हजारो एकर जमिन निजाम सरकारने मठाला दिली होती. या मठाच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर सोलार प्रकल्प उभारण्याचा निर्णय मंदिर संस्थांकडून घेण्यात आला आहे. मात्र या सोलार प्रकल्पातून येणाऱ्या अर्थिक उत्पन्नाचा निम्मा हिस्सा मठाला देण्यास भोपे पुजारी मंडळाकडून विरोध करण्यात येत आहे. यामुळे मठाच्या जमिनीसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि पुजारी यांच्यात वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. 

तुळजाभवानी मंदिरात विविध सेवा देण्यासाठी निजाम सरकारने मठाला हजारो एकर जमीन दिली आहे. तर तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जमिनीवर १३५० कोटींच्या गुंतवणुकीतून ३०० मेगावॅटचा सोलार प्रकल्प उभारला जाणार आहे. या बाबत मंदिर संस्थानकडून बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात वेगवेगळ्या सेवा पुरवणाऱ्या मठाच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या अनुषंगाने मंदिर संस्थानच्या जमिनीवर हा सोलार प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

आर्थिक उत्पन्नाचा हिस्सा मठास देण्यास विरोध 

मंदिर संस्थानकडे जवळपास १५०० एकर जमीन उपलब्ध आहे. या जागेवर ३०० मेगावॅट क्षमतेचा सोलार प्रकल्प उभा केला जाणार आहे. मंदिर संस्थानच्या मालकीची आणि मठांच्या ताब्यात असलेली ही १५०० एकर जमीन सोलार प्रकल्प उभारण्यासाठी भाड्याने देण्यात येणार आहे. मात्र यामधून येणाऱ्या आर्थिक उत्पन्नाचा अर्धा हिस्सा मठाला देण्यास पुजारी मंडळाकडून विरोध करण्यात आलाय. त्यामुळे मठाच्या जमिनीसाठी वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.

न्यायालयात जाण्याचा इशारा 
दरम्यान तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जमिनीची परस्पर विलेवाट लावत असल्याचा आरोप भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केला आहे. तसेच मंदिर संस्थांनने यासंदर्भात मनमानी कारभार केला; तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊ असा इशाराही पुजारी मंडळाकडून देण्यात आला आहे. यामुळे मंदिर संस्थान आणि पुजारी यांच्यात वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT