Tulja Bhawani Mandir Saam tv
महाराष्ट्र

Tulja Bhawani Mandir : तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणे भोवले; ८ पुजाऱ्यांवर मंदिर प्रवेश बंदी, तुळजाभवानी मंदिर प्रशासनाची कारवाई

Dharashiv News : तुळजाभवानी मंदिरात भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र अनेक भाविक हे गुटखा, तंबाखू सेवन करून थुंकत असतात. यामध्ये मंदिरातील पुजारी तसेच कर्मचारी देखील थुंकत असल्याचे निदर्शनास आले होते

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: मंदिराच्या आवारात तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकल्यास कारवाई करण्याचा इशारा तुळजाभवानी मंदिर प्रशासनाकडून देण्यात आला होता. हा नियम मंदिरातील पुजारी, कर्मचारी तसेच भाविकांसाठी देखील आहे. दरम्यान मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणाऱ्या ८ पुजाऱ्यांवर मंदिर प्रवेश बंदीची कारवाई मंदिर प्रशासनाने केली आहे. या कारवाईमुळे पुजाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र अनेक भाविक हे गुटखा, तंबाखू सेवन करून थुंकत असतात. यामध्ये मंदिरातील पुजारी तसेच कर्मचारी देखील थुंकत असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे मंदिराच्या आवारात स्वच्छता राहावी या अनुषंगाने तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने कडक नियम लागू करत तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. 

पुजाऱ्यांवरच पहिली कारवाई 

मंदिर प्रशासनाने लागू केलेल्या नियमानुसार श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याबाबत मंदिर संस्थान कडून मागील महिन्यात काही पुजाऱ्यांना कारवाईचा इशारा देऊन नोटीस देण्यात आल्या होत्या. या ८ पुजाऱ्यांवर मंदिर संस्थान कडून प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या कार्यवाहीमुळे अस्वच्छता करणाऱ्या पुजाऱ्यांचे चांगलेच धाबे दनाणले आहे.

सहा पुजाऱ्यांवर 1 महिना तर दोन पुजाऱ्यांवर 3 महिने बंदी

दरम्यान नोटीस बजावण्यात आलेल्या पुजाऱ्यांपैकी ६ जणांनी नोटिशीची दखल घेऊन आपला माफीनामा सादर केला होता. यामुळे त्यांच्यावर १ महिन्याची प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तर नोटीस देऊन खुलासा व माफीनामा न देणाऱ्या दोन पुजाऱ्यावर तीन महिन्याची बंदी करण्यात आली आहे. संबंधित पुजाऱ्यांना अशोभनीय व मंदिराचे शिस्तीस बाधा आणणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेस अडथळा निर्माण करणारे वर्तन करण्यास जबाबदार ठरवण्यात आले आहे. ही कारवाई देऊळ कवायत कायदा 1909 कलम 24 व 25 नुसार करण्यात आलेली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : तुम्ही सुद्धा चपातीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवताय? मग वेळीच थांबा, नाहीतर...

Migraine Care: प्रवास करताना डोकेदुखी होतेय? जाणून घ्या कारणं अन् त्यावर सोपे उपाय

Ladki Bahin Yojana Scam : लाडक्या बहिणींचे पैसे लाटले, आता १४ हजार पुरुषांवर होणार कारवाई; सरकारचा इशारा

Bin Lagnachi Goshta: जुन्या नात्यांची नवी इनींग; निवेदिता सराफ-गिरीश ओक यांची 'बिन लग्नाची गोष्ट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले; ७५% लोकांची पसंती|VIDEO

SCROLL FOR NEXT