Dharashiv Crime Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv Crime : कळंब शहरात दुकानावर दरोडा; १ लाख रुपये व सोने चांदीच्या दागिन्यांची चोरी

Dharashiv News : धाराशिवच्या कळंब शहरातील ब्रिजलाल भुतडा यांचे दुकान आहे. रात्री दुकान बंद करून ते घरी गेल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास आठ चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रकार समोर आला

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : धाराशिवच्या कळंब शहरातील लक्ष्मी रोड येथील व्यापारी ब्रिजलाल भुतडा यांच्या श्री गणेश ट्रेडिंग कंपनी या दुकानाचे शटर कापून दरोडा टाकण्यात आला. यात चोरट्यांनी दुकानात असलेली १ लाख रुपयांची रोख रक्कम यासह सोने व चांदीचे दागिने लांबविल्याचे समोर आले आहे.  

धाराशिवच्या (Dharashiv News) कळंब शहरातील ब्रिजलाल भुतडा यांचे दुकान आहे. रात्री दुकान बंद करून ते घरी गेल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास आठ चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रकार समोर आला. दरम्यान दुकानाचे शटर गॅस कटरने कापून आठ चोरट्यानी व्यापाऱ्यांच्या दुकान व घरावर हल्ला केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान दरोडेखोरांनी एक लाख रुपये सोने चांदीचे दागिने चोरी केले असुन (CCTV) सीसीटीव्ही कॅमेराची तोडफोड केली आहे.  

तीन दरोडेखोर ताब्यात 

दरम्यान घडला प्रकाराबाबत व्यापारी ब्रिजलाल भुतडा यांनी लागलीच (Police) पोलिसात तक्रार दिली. यानंतर नसुन व्यापारी व पोलिसांच्या प्रयत्नातून ३ आरोपींना पकडण्यात आले आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पोलिसांकडून याचा तपास सुरु करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : परतवाडा-चिखलदरा मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची प्रचंड वाहतूक कोंडी

Nandurbar : नंदुरबारच्या गावांची व्यथा ७५ वर्षांनंतरही विकासापासून वंचित; वर्गणी जमा करत तयार केला ६ किलोमीटर रस्ता

Kashish Kapoor : 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या घरी चोरी; नोकर ४ लाख रुपये घेऊन फरार, नेमकं प्रकरण काय?

Investment Tips : १ कप कॉफीच्या पैशात ₹१ कोटींची संपत्ती, वाचा कोट्यधीश होण्याचा संयमी मार्ग

Monsoon Health Tips: चिमुकल्यांना रिकाम्या पोटी द्या बडीशेपचं पाणी; पावसाळ्यात राहतील आजारांपासून दूर

SCROLL FOR NEXT