Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News: शिक्षणाधिकारींच्या दालनातच ग्रंथपालाने अंगावर टाकले पेट्रोल; जुन्‍या पेंशनसाठी आत्मदहनाचा प्रयत्न

शिक्षणाधिकारींच्या दालनातच ग्रंथपालाने अंगावर टाकले पेट्रोल; जुन्‍या पेंशनसाठी आत्मदहनाचा प्रयत्न

साम टिव्ही ब्युरो

बालाजी सुरवसे

धाराशिव : अर्धवेळ ग्रंथपालची सेवा जुन्या पेन्शनसाठी ग्राह्य धरण्याबाबत न्यायालयाचे आदेश असतानाही याबाबत कार्यवाही होत नाही. यामुळे (Zilha Parishad) जिल्‍हा परिषदेतील माध्‍यमिक शिक्षणाधिकारी यांच्‍या दालनात येत ग्रंथपालाने अंगावर पेट्रोल (Petrol) ओतून आत्‍मदहनाचा प्रयत्‍न केला. (Breaking Marathi News)

भुम शहरातील रविंद्र हायस्कूलमधील ग्रंथपाल बाळु आत्माराम कुंभार असे ग्रंथपालाचे नाव आहे. न्यायालयाची निकाल प्रत शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे दाखल करुन देखील त्यावर कुठलीच कार्यवाही झाली नाही. दरम्यान पैसे देऊनही काम मार्गी लागत नसल्याने ग्रंथपाल बाळु कुंभार यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच गोंधळ निर्माण झाला.

बाळू कुंभार यांनी आज जिल्हा परिषदेमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी (Education Officer) गजानन सुसर यांच्या दालनात पेट्रोल ओतुन घेवुन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावेळी उपस्‍थीतांनी वेळीच हस्‍तक्षेप केल्‍याने पुढील अनर्थ टळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खराडी भागात आगीची घटना

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

SCROLL FOR NEXT