Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News : विहिरीत पडल्याने शेतमजुराचा मृत्यू; तिसऱ्या दिवशी घटना आली उघडकीस

Dharashiv News : गायकवाड हे कामावर गेल्यानंतर ६ तारखेपासून ते घरी आले नसल्याने कुटुंबियांकडून त्याचा शोध सुरु होता.

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : कोरड्या विहीरीत पडल्याने शेतमजूराचा मृत्यू झाल्याची घटना धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सोनगिरी (Dharashiv) येथे घडली. घटनेच्या तिसऱ्या दिवशी हा सर्व प्रकार उघडकीस आला. दरम्यान परंडा पोलिसांनी मृतदेह (Death) क्रेनच्या साह्याने बाहेर काढला. (Tajya Batmya)

धाराशिवच्या सोनगिरी येथे घडलेल्या घटनेत अशोक गायकवाड असे मृत झालेल्या शेतमजूराचे नाव आहे. अशोक गायकवाड हा मुळ सातारा (Satara) जिल्ह्यातील वाई येथील असुन सोनगिरी येथे सासरवाडीत मजुरीचे काम करीत होता. दरम्यान गायकवाड हे कामावर गेल्यानंतर ६ तारखेपासून ते घरी आले नसल्याने कुटुंबियांकडून त्याचा शोध सुरु होता. मात्र ते घरी न आल्याने मुळ गावी गेले असतील असा अंदाज त्यांच्या कुटुंबीयांनी बांधला होता.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विहिरीजवळ चप्पल दिसल्याने घटना उघड 

मात्र सोनगिरी येथील आंगत वेताळ हे ८ फेब्रुवारीला शेतात गेले असता शेताच्या कडेला चप्पल दिसल्याने विहीरीत डोकावून पाहीले. यावेळी त्यांना विहिरीत व्यक्ती पडलेला दिसून आला. दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवुन ७० ते ८० फुट धोकादायक विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. मात्र शेतमजुर विहीर कसा पडला याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'ब्लू' टी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर, कधी आणि कसं प्यावे जाणून घ्या

Idli Bhaji Recipe : उरलेल्या इडलीपासून बनवा कुरकुरीत भजी, घरच्यांना आवडेल ही हटके रेसिपी

Coronary artery disease: तुमचं ब्लड प्रेशर नेहमी नॉर्मल; तरीही हृदयातील ब्लॉकेजचा धोका कसा ओळखायचा? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai-Pune Train: पुणे-मुंबईकरांना मोठा दिलासा, १० दिवसांनतर रेल्वे रूळावर; कोणकोणत्या ट्रेन सुरू झाल्या?

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

SCROLL FOR NEXT