Blue Colored Water VIDEO Saam Tv
महाराष्ट्र

Blue Colored Water VIDEO: वीज पडली अन् पाणी निळं झालं; व्हायरल व्हिडिओमागील सत्य काय?

Rohini Gudaghe

बालाजी सुरवसे, साम टीव्ही धाराशिव

राज्यात यंदा मान्सूनचं दणक्यात आगमन झालं आहे. विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटात अन् ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहे. असाच जोराचा पाऊस धाराशिवमध्ये झाला आहे. दोन दिवसापूर्वी धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आणि एका ठिकाणी वीज कोसळली. वीज कोसळल्यानंतर तेथून निळ्या रंगांचं पाणी वाहण्यास सुरूवात झाल्याचा व्हिडिओ समोर आलं आहे.

कुठे येतंय निळ्या रंगांचं पाणी?

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला येथे ही घटना (Blue Colored Water VIDEO) ९ जून रोजी समोर आली आहे. एका शेतात वीज पडल्यानंतर तेथील जमिनीतून निळ्या रंगाचे पाणी सातत्याने येत आहे. हे निळ्या रंगाचे पाणी जमिनीतून येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हे पाणी पाहण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, तसेच या पाण्याचा व्हिडिओ (Blue Colored Water) देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निळ्या रंगाचं पाणी का येतंय? याचा प्रशासन शोध घेत आहे. भुगार्भतुन हे पाणी येत असल्यामुळे लोक व्हिडिओ काढत आहेत.

निळ्या रंगाच्या पाण्याच्या व्हिडिओमागील सत्य काय?

जमिनीतून निळ्या रंगाचं पाणी बाहेर येतंय. अनेक जणांनी याला निसर्गाची अद्भूत किमया असल्याचं देखील म्हटलं आहे. या ठिकाणी तलाठी आणि गावकऱ्यांनी भेट दिली. निळ्या रंगांचं पाणी येत असलेल्या ठिकाणाची त्यांनी पाहणी केली (Dharashiv News) आहे. यावेळी त्यांना आजूबाजूला काही कचऱ्याचे डबे दिसून आले आहेत. या डब्यांमध्ये निळा रंग देखील त्यांना आढळला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी त्या निळ्या रंगांच्या डब्यांमुळे पाण्याचा रंग निळा झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला (Fact Check) आहे.

राज्यात मुसळधार पाऊस

राज्यात पहिल्या पावसात वीज पडून अनेक जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. परभणी जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू, तर येलदरीत शेतमजुराचा तर धारासूरमध्ये १३ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर (Rain) आली आहे. जूनच्या पहिल्याच मोठ्या दमदार पावसाने दोघांचा बळी घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. काल नवी मुंबईमध्ये एका बांधकामाधिन इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT