Ashadhi Ekadashi Saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Ekadashi : कुंथलगिरीचा प्रसिद्ध पेढा वाढवणार वारकऱ्यांच्या तोंडाची गोडी; आषाढीनिमित्त धाराशिव जिल्ह्यातून जाणार १० टन पेढा

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूरमध्ये राज्यभरातून भाविक दाखल होत आहेत. येथे आलेल्या भाविकांसाठी मंदिर समितीकडून लाडू बनविण्याचे काम सुरु असून आता कुंथलगिरीचा प्रसिद्ध पेढा वारकऱ्यांच्या तोंडाची गोडी वाढवणार आहे. त्या अनुषंगाने पेढे बनविण्याचे काम रात्रंदिवस सुरु आहे. 

धाराशिव (Dharashiv News) जिल्ह्यातील भूम तालुक्यातील कुंथलगिरीचा पेढा राज्यातच नव्हे तर जगभर प्रसिद्ध आहे. यंदा पहिल्यांदाच आषाढी वारीच्या निमित्ताने कुंथगिरीतील हा जगप्रसिद्ध केला पंढरीला (Pandharpur) जाणार आहे. दहा हजार किलो अर्थात दहा टन वजनाचा पेढा प्रसाद म्हणून वारकऱ्यांना मिळणार आहे. यासाठी भूम शहरातील विनोद जोगदंड यांच्या खवा क्लस्टरमध्ये हा पेढा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आषाढीच्यापूर्वी हा पेढा तयार करून पंढरपूरमध्ये पाठविण्यात येणार आहे. 

सौर उर्जेवर बनविला जातोय पेढा 

हायजेनिक आणि उच्च क्वालिटीचा हा पेढा बनवण्यासाठी विशेष मेहनत घेतली जात आहे. यासाठी वीस ते पंचवीस कामगार अहोरात्र मेहनत घेत आहेत. पेढ्याच्या गुणवत्तेचा दर्जा अधिक वाढावा यासाठी सौर उर्जेवर हा पेढा बनवला जातो आहे. येत्या दोन दिवसात दहा टन पेढा बनवून तो पंढरपूरमध्ये पाठवून भाविकांना दिला जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT