MP likely to leave shivsena thackeray faction Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ठाकरेंचा आणखी एक खासदार फुटणार? महायुतीत जाणार? सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चांना उधाण

MP Omraje Nimbalkar : धाराशिवचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे ते ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Yash Shirke

बालाजी सुरवसे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra Politics : स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडूनही मोर्चेबांधणीला सुरुवात होत आहे. पक्षामध्ये फेरबदल होणार असल्याचेही म्हटले जात आहे. निवडणुकांची तयारी सुरु असताना ठाकरे गटामध्ये गळती सुरुच आहे. अशात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या एका पोस्टमुळे ते ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

काल (२६ जानेवारी) धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती होती. जयंतीनिमित्त धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यांनी पोस्टद्वारे धर्मवीर आनंद दिघे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले. पण या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे यांचा फोटो वगळण्यात आला.

Omraje nimbalkar social media post

सोशल मीडिया पोस्टमध्ये ठाकरेंचा फोटो वगळण्यावरुन राजकीय चर्चा रंगल्या आहेत. ओमराजे निंबाळकर ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चाही होत आहेत. प्रताप सरनाईक यांनी धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ओमराजे निंबाळकर यांच्याकडे बोट दाखवक ते महायुतीचेच असल्याचे वक्तव्य केले होते.

प्रताप सरनाईक यांचा दावा खोडून काढत ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पण त्यानंतर लगेच त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर ही पोस्ट शेअर करण्यात आली. आता व्हायरल पोस्टमुळे खासदार ओमराजे निंबाळकर राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT