Dharashiv Political News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : "काय म्हणताय धाराशिव?" सोशल मीडियाच्या माध्यमातून महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Dharashiv Political News : धाराशिवमध्ये महायुतीतील शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव वाढला आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यांवर भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मिडियावर टीका केली आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Alisha Khedekar

  • धाराशिवमध्ये महायुतीच्या शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय तणाव वाढला

  • माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यांवर भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मिडियावर टीका केली

  • “काय म्हणताय धाराशिव?” टॅगलाईनखाली आरोप प्रत्यारोप सुरु

  • महायुतीतील अंतर्गत वाद चर्चेत

बालाजी सुरवसे, धाराशिव

राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली असून जसं जशा निवडणुका जवळ येत आहेत तसं तसे राजकारण भलतेच तापताना पाहायला मिळतं आहे. महायुतीच ट्रिपल इंजिन सरकार सुरळीत सुरु असलं तरी युती अंतर्गत नेतेमंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप तसेच धुसफूस करत आहेत. अशातच धाराशिव जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची चिन्ह दिसू लागली आहे.

माजी मंञी तानाजी सावंत यांनी भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता राणा जगजीत सिंह पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र दिसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत असून,“काय म्हणताय धाराशिव? या टॅग लाईन खाली आमदार सावंत यांच्यावर त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची आठवण करून देत टीका केली जात आहे.

माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काही जुन्या वादग्रस्त वक्तव्यांचा आधार घेत भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टीकेची मोहीम उघडली आहे. “हाफकिन कोण आहे?”असा प्रश्न आरोग्यमंत्री असताना सावंत यांनी विचारला होता त्याचप्रमाणे,“महाराष्ट्राला भिकारी करीन,पण मी भिकारी होणार नाही”या वादग्रस्त वक्तव्याचा ही राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडिया वरती उल्लेख केला जात आहे.

“काय म्हणताय धाराशिव?”या टॅगलाईनखाली भाजप कार्यकर्ते आणि समर्थक तानाजी सावंत यांच्यावर टीका करत आहेत.काही पोस्टमध्ये सावंत यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे,तर काही पोस्टमध्ये थेट राजकीय आरोप करण्यात येत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे धाराशिव जिल्ह्यात शिवसेना-भाजप यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Alert : महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी! परभणीत तापमान ६ अंशावर; इतर जिल्ह्यात हवामान कसं?

DA Hike: ३% की ५%, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार ? वाचा सविस्तर

Til Barfi Recipe : मकर संक्रांतील पाहुण्यांसाठी खास बनवा तिळाची मऊसूत बर्फी, वाचा सिंपल रेसिपी

Maharashtra Live News Update: राज्यातील सर्वाधिक थंडी पूर्ण शहरात, पारा ९.५ अंशावर

Priyanka Chopra Photos : डोळ्यात आग अन् रक्ताने माखलेले शरीर; 'द ब्लफ'मधील प्रियंका चोप्राचा खतरनाक लूक समोर, रिलीज डेट काय?

SCROLL FOR NEXT