Dharashiv Crime Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv Crime : बँकेची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांचा आत प्रवेश; दरोड्याचा प्रयत्न फसला

Dharashiv News : लोखंडी ग्रील असलेली खिडकी तोडली. यानंतर त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. येथे असलेली तिजोरी देखील फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्य तिजोरी न तुटल्याने चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बँकेची तिजोरी लक्ष केली होती. यासाठी चोरट्यानी बँकेची लोखंडी ग्रील असलेली खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केला. मात्र बँकेची तिजोरी न तुटल्याने दरोडेखोरांना खाली हात परतावे लागले. यामुळे बँकेच्या तिजोरीत असलेली रक्कम सुरक्षित राहिली आहे. मात्र चोरट्यांच्या हालचाली बँकेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या आहेत. 

धाराशिवच्या परंडा येथे हि घटना घडली असून परांडा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेची खिडकी तोडून बँक लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न करण्यात आला आहे. चोरट्यानी गॅस कटरच्या सहाय्याने लोखंडी ग्रील असलेली खिडकी तोडली. यानंतर त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. येथे असलेली तिजोरी देखील फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्य तिजोरी न तुटल्याने चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. 

२५ लाख रुपयांची रोकड सुरक्षित 

दरम्यान आज सकाळी बँक उघडल्यानंतर कर्मचाऱ्यांना खिडकी तोडल्याचे निदर्शनास आले. यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र तिजोरी न तुटल्याने बँकेच्या तिजोरीत असलेल्या साधारण २५ लाख रुपयांची रोखड वाचल्याने बँकेला दिलासा मिळाला आहे. तरी देखील बँकेकडून चोरीच्या अयशस्वी प्रयत्नाबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी बँकेत येऊन तपासणी केली. तरी आता चोरांना शोधण्याचं परंडा पोलिसांसमोर आव्हान आहे. 

पोलीस स्टेशनपासून २०० मीटर अंतरावर बँक 

परंडा पोलीस स्टेशन पासून अवघ्या २०० मिटर अंतरावर असलेल्या बँकेत दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चोरट्याने कपडा झाकून बँक लुटण्याचा प्रयत्न केला आहे. आता अज्ञात चोरट्या विरोधात परांडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Festival Makeup Look: सणासुदीला खास लूक हवा असेल तर यावेळी 'हा' मेकअप लूक नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जालना रोडवर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणार की नाही? समोर आली मोठी अपडेट

Dussehra 2025: दसऱ्याला आवर्जून करा ही ३ कामे, पैशांची तंगी होईल कायमची दूर

Scheduled Caste : अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केलं नाही, तर...; फडणवीस सरकारला कुणी दिला मोठा इशारा?

SCROLL FOR NEXT