Dharashiv  Saam Tv
महाराष्ट्र

Dharashiv : बसस्थानकात मोबाइलवर पॉर्न व्हिडीओ लावले, शाळकरी मुलींकडे पाहून अश्लील हावभाव; मौलवीचा VIDEO व्हायरल

Dharashiv Police: धाराशिवमध्ये धक्कादायक घटना घडली. मौलवी बसस्थानकावर बसून पॉर्न पाहत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मौलवीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

धाराशिवमध्ये मौलवीने बसस्थानकावर बसून पॉर्न व्हिडीओ पाहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मौलवीने पॉर्न व्हिडीओ पाहत शाळकरी मुली आणि महिलांकडे पाहून अश्लिल हावभाव केले. या मौलवीचा पॉर्न पाहतानाचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. या मौलवीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवच्या नळदुर्ग येथील बसस्थानकावर हा प्रकार घडला आहे. मौलवी वर्दळीचे ठिकाण असेलल्या बसस्थानकावर बसून मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहत होता. यावेळी तो शाळकरी मली आणि महिलांकडे पाहून त्यांना हे पॉर्न व्हिडीओ दाखवल्यासारखे करत अश्लील हावभाव करत होता. हा प्रकार पाहून महिला प्रवाशांनी संताप व्यक्त केला. बसस्थानकावर असणाऱ्या एका प्रवाशाने मौलवीचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

पॉर्न पाहणाऱ्या मौलवीविरोधात सुनिल माणिकराव गव्हाणे यांनी तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मौलवीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाई केली. कासीम अब्दुल रहीम इनामदार असं आरोपी मौलवीचे नाव आहे. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहीता 2023 च्या कलम 294(1), 294(2) आणि 296 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजधानी दिल्लीत दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, ISI चे ९ संशयित दहशतवादी ताब्यात

Maharashtra News Live Update: हिंगोलीत एक हजार दोनशे एकरमधील सव्वा लाख झाडांची कत्तल

Maharashtra Politics: मोठी बातमी! शरद पवारांना मोठा धक्का, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपामध्ये प्रवेश

LPG Rules : एक घर, एक गॅस कनेक्शन... 1 जूनपासून LPG च्या नियमात होणार ५ महत्त्वाचे बदल

Batatyacha Pancake: नाश्त्यासाठी बनवा बटाट्याचे कुरकुरीत पॅनकेक्स, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT