Dharashiv Mauli Giri youth beaten up Saam Tv News
महाराष्ट्र

मुलाला काही झालं तर आम्ही आत्महत्या करु, लेकाची मृत्यूशी झुंज, आई-बापाचा आक्रोश, प्रेम संबंधातून पोराला मारहाण

Dharashiv Mauli Giri Youth Beaten : धाराशिव जिल्ह्यातील भूम इथे १८ वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड, काठीने अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली होती. मारहाणीनंतर तरुणाला मृत समजून विवस्त्र अवस्थेत फेकलं.

Prashant Patil

धाराशिव : प्रेम प्रकरणातून अमानुष पद्धतीने मारहाण झालेल्या धाराशिव येथील तरुणाची सध्या मृत्यूची झुंज सुरु आहे. मारहाण झाल्यापासून तरुण शुद्धीवर नसल्याची माहिती आई-वडिलांनी दिली आहे. सोलापुरातील खासगी रुग्णालयात एक आठवड्यापासून त्याच्यावर उपचार सुरु होते. एकुलत्या एका मुलाचं काही बरं वाईट झालं तर आम्ही आत्महत्या करु, असं म्हणत आई-वडिलांनी आक्रोश केला आहे. आरोपींना तात्काळ अटक करत फाशीची शिक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. माऊली गिरी असं या तरुणाचं नाव आहे.

धाराशिव जिल्ह्यातील भूम इथे १८ वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड, काठीने अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली होती. मारहाणीनंतर तरुणाला मृत समजून भूम तालुक्यातील पांढरेवाडी शिवारात विवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आलं होतं. सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आली होती. पाठीपासून तळपायापर्यंत बेदम मारहाण करण्यात आली होती. गुप्तांगालाही तीक्ष्ण वस्तूने इजा केल्याची माहिती देण्यात आली आहे. तरुण मृत झाल्याचं समजून रस्त्यालगत विवस्त्र अवस्थेत फेकून दिलं होतं.

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज सुरु आहे. मुख्य आरोपी सतीश जगतापसह सात जणांविरोधात अंबी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपी फरार आहेत. प्रेम प्रकरणातून ही मारहाण झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT