"वेलकम बॅक टू स्कुल" धनंजय मुंडेंकडून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत रश्मी पुराणिक
महाराष्ट्र

"वेलकम बॅक टू स्कुल" धनंजय मुंडेंकडून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत

विद्यार्थ्यी व शिक्षकांचा उत्साह पाहून एक वेगळाच आनंद झाला -धनंजय मुंडे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

परळी - कोविड कालावधीच्या मोठ्या ब्रेक नंतर आज प्रथमच परळी Parali तालुक्यातील टोकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांना पालकमंत्री ना. धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी गुलाब पुष्प देत त्यांचे शाळेत स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या वर्गात जाऊन त्यांच्याशी संवाद साधत पालकमंत्री महोदय 'वेलकम बॅक टू स्कुल...' म्हणताच विद्यार्थ्यांनी एका सुरात 'थॅंक यु सर...' म्हणत दिलेल्या प्रतिसादाने शाळेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.

कोविडच्या काळात जवळपास दीड वर्ष शाळा बंद राहिल्यानंतर, आता दुसरी लाट ओसरली आहे. राज्य सरकारने शाळांची घंटा वाजण्याचा निर्णय घेतला असून राज्यात आज शाळा सुरू झाल्या असून राज्यभरात शिक्षणोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद शाळा टोकवाडी येथे जाऊन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शिक्षणोत्सव पुढे अखंडित सुरू राहावा अशा शुभेच्छा दिल्या.

हे देखील पहा -

पुन्हा नव्याने शाळा सुरू झाल्या आहेत, त्या आता कायम सुरू राहाव्यात यासाठी विद्यार्थ्यांची मास्क, सॅनिटायझर, अन्य स्वछता यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण केले जावे तसेच शाळेचा परिसर स्वच्छ ठेवावा याबाबत संबंधितांना सक्तीच्या सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत.

यावेळी ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आले.मधल्या काळात शाळा बंद राहिल्यामुळे विशेषकरून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले, पण आज शाळा पुन्हा सुरू होताना विद्यार्थी व शिक्षकांच्या मनातील उत्साह एक वेगळाच आनंद देतो आहे, तसेच मधल्या काळात झालेले शैक्षणिक नुकसानही भरून निघेल असा विश्वास वाटतो असल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी पंचायत समितीचे सभापती बालाजी (पिंटू) मुंडे, मार्केट कमिटीचे संचालक सूर्यभान नाना मुंडे, डॉ. राजाराम मुंडे, टोकवाडीच्या सरपंच सौ. गोदावरीताई मुंडे, ग्रा.प. सदस्य तुकाराम काळे, नामदेव मुंडे, सुरेश रोडे, शालेय समितीचे अध्यक्ष मदन काळे, गणेश मुंडे, माधव मुंडे,यांसह शाळेचे मुख्याध्यापक श्याम आघाव तसेच शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खरातची आलिशान गाडी सीझ

IPL मध्ये मोठी उलथापालथ; अचानक वेळापत्रकात मोठा बदल, ऐनवेळी ठिकाणच बदलले, काय आहे कारण?

Accident News : मेव्हणीला पळवून नेत होता भावोजी; आडवायला आलेल्या सासरच्यांना कारने चिरडले, मेव्हण्यासह तिघांचा मृत्यू

Nashik Crime: नाशिक हादरले! दिवसाढवळ्या महिलेकडून तरुणाची हत्या, आधी दगडाने ठेचलं नंतर कोयत्याने सपासप वार; थरकाप उडवणारा VIDEO

IPL 2026 : तो कोणीही असो, चुकीला माफी नाहीच! RCB च्या स्टार खेळाडूसह हार्दिक पंड्यावरही मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT