सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज धुळे दौऱ्यावर भूषण अहिरे
महाराष्ट्र

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज धुळे दौऱ्यावर

धनगर समाजाचा मेळाव्यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज धुळे जिल्ह्यातील साक्री येथे आले आहेत.

भूषण अहिरे

धुळे: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज धुळे दौऱ्यावर आले आहेत. धनगर समाजाचा मेळावा या कार्यक्रमासाठी हे दोघे मंत्री धुळे जिल्ह्यातील साक्री येथे आले असता मंत्री धनंजय मुंडे यांना बीड येथील एसटी चालकाच्या आत्महत्या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी या संदर्भात ही घटना ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हणत एसटी चालकाच्या आत्महत्या संदर्भातील सर्व बाबी तपासल्या जातील असं आश्वासन दिलं. खरंच वीज वितरण विभागातर्फे वीज कनेक्शन कापण्यात आले होते का, त्याचबरोबर त्यांच्या आत्महत्येचे मूळ कारण काय याचा देखील तपास सुरु असून काही तासातच त्याचं मूळ कारण काय होतं हे स्पष्ट होईल अशी माहिती त्यांनी दिली. (Social Justice Minister Dhananjay Munde and Water Resources Minister Jayant Patil are on a visit to Dhule today)

हे देखील पहा -

त्याचबरोबर कृज पार्टी प्रकरणात एनसीबीतर्फे या प्रकरणाचा तपास करणारे प्रमुख अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरती दोन पोलिस कर्मचारी पाळत ठेवत असल्याची तक्रार डीजीपींकडे दाखल झाल्या प्रकरणी विचारणा केली असता मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यासंदर्भातील ही माहिती समजली असून पोलिसांकडे तक्रार गेलेली असल्यामुळे पोलिस याचा तपास लावतील असं म्हणत या प्रश्नावर बोलणं टाळल आहे.

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार एम्पिरिकल डेटा देत नसून याबाबत आपली काय भूमिका आहे. यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ''केंद्र सरकार कोणत्या विचारांचे आहे. त्या विचारांना ओबीसी आरक्षण मान्य नसून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला त्यावेळी राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार होते, त्याचवेळी त्यांनी हा डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर करणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी तो अद्यापही सादर न केल्याने ओबीसी आरक्षणाच्या विरोधात कोण आहे हे ओबीसी समाजाला समजले आहे.'' अशी टीका धनंजय मुंडे यांनी यावेळी भाजपावर केली आहे.

मंत्री जयंत पाटील यांना धनगर समाजाचा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला धनगर व धनगर या शब्दामुळे निर्माण झालेल्या आरक्षणाच्या प्रश्नाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, हा वाद सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. भाजपतर्फे १०० दिवसांत मध्यवर्ती निवडणुकांसंदर्भात प्लॅन तयार केला असून राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याच्या संदर्भात विचारणा केली असता मध्यावधी निवडणुकांचा प्रश्नच येत नसून पुढील सहा महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असे वक्तव्य जयंत पाटील यांनी यावेळी केले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT