मुंबई : दावोसमध्ये वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत. २० ते २४ जानेवारीला मुख्यमंत्री दावोसच्या दौऱ्यावर असणार आहेत. यासाठी देवेंद्र फडणवीस १९ तारखेला पहाटे मुंबईतून रवाना होणार आहेत. सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करणारा आणि आकांक्षांनी परिपूर्ण महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणण्याच्या हेतूने, हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार असल्याची माहिती आहे.
यापूर्वी देवेंद्र फडणवीस त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ३ वेळा दावोसमध्ये वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये सहभागी झाले होते. तेव्हा औद्योगिक विकासात पाचव्या क्रमांकावरुन महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला होता. राज्यात त्या काळात मॅग्नेटिक महाराष्ट्राचे दोन वेळा आयोजन झाले. आताही या दौर्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विविध कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती आहे.
या दौऱ्यादरम्यान अनेक जागतिक नेत्यांची भेट मुख्यमंत्री घेणार आहेत. या दौर्यात मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री उदय सामंत तसेच एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको अधिकार्यांचे शिष्टमंडळ असणार आहेत. या दौऱ्यात डेटा सेंटर्स, ऑटोमोबाईल्स, सेमिकंडक्टर, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग, औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात मोठ्या संख्येने सामंजस्य करार होणार आहे.
तसेच या दौऱ्यात महाराष्ट्रात १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न होणार आहे. अर्थात प्रामुख्याने यातून रोजगारनिर्मितीचेही उद्दिष्ट साध्य होईल. महाराष्ट्रात त्यांनी विविध प्रकारची धोरणे अलिकडेच जाहीर केली होती. यातून महाराष्ट्राच्या एकूणच सर्वांगिण विकासाला चालना मिळेल.
समतोल विकासावर भर
राज्यात गुंतवणूक आणताना किंवा पायाभूत सुविधांचा विकास करताना, आम्ही सातत्याने चौफेर विकास कसा होईल आणि प्रादेशिक समतोल कसा राखला जाईल, यावर भर दिला. या दावोस दौर्यात सुद्धा महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात आणि सर्व विभागात गुंतवणूक कशी येईल, या दृष्टीने आमचे प्रयत्न असतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.