Amol Mitkari 
महाराष्ट्र

फडणवीस राजकारणात खुन्नस काढतात, मिटकरींचे फटकारे

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कमळाच्या फुलांनीच या देशाचा घात केला. देवेंद्र फडणवीस यांना पाच वर्षांत जे जमले नाही, ते आम्ही दोन वर्षांत केले. फडणवीस यांनी फक्त खुनशी राजकारण केले. आमदार नीलेश लंके यांनी कोरोनात रुग्णसेवा करून अनेकांचे जीव वाचविले. गाडगे बाबांसारखी रंजल्या-गांजलेल्यांची सेवा केली. भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन आमदार अमोल मिटकरी यांनी केले.

पारनेर तालुक्यातील शिरापूर येथे कोल्हापुर पद्धतीचा बंधारा (७८ लाख), उचाळे वस्ती रस्ता (२५ लाख रुपये), व ३३ /११ केव्ही वीज उपकेंद्रासाठी (३० लाख) एक कोटी ३३ लाखांच्या विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती शिरापूरचे मधुकर उचाळे, माहिती व तंत्रज्ञान प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे, अॅड. राहुल झावरे, अध्यक्ष बाबासाहेब तरटे, अशोक सावंत, ठकाराम लंके, सरपंच गुंडा भोसले, पोपट माळी, जयसिंग मापारी आदी उपस्थित होते.

मिटकरी म्हणाले, की मंदिरे उघडण्याकरिता ढोल वाजविणाऱ्या भाजपच्या लोकांना हे माहीत नाही, की जनसेवा हीच खरी सेवा आहे. त्यांना गाडगेबाबा माहीत नसावेत असे वाटते. आमदार लंकेंच्या कामावर पीएच.डी. होईल, असेही ते म्हणाले.

लंके म्हणाले, की पक्षाच्या अडचणीच्या व चढ-उताराच्या काळात साथ देणारे व सदैव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी असणारे गाव म्हणजे शिरापूर. कोरोनाचे संकट असल्याने निधी मिळण्यात अडचणी येत आहेत. मात्र, आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावात विकासाची गंगा पोचली पाहिजे, हे माझे ध्येय आहे. आतापर्यंत शंभर कोटींचा निधी तालुक्यात आणला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT