अहमदनगर ः नगर लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. त्यातही कर्जत-जामखेडमध्ये हक्काची जागा. परंतु रोहित पवार यांनी नगर जिल्ह्यात प्रवेश केल्यापासून हे राजकीय समीकरणच बदलून गेले आहे. विधानसभेला दिग्गज नेते प्रा. राम शिंदे यांना पराभूत केल्यानंतर पवार यांनी संपूर्ण मतदारसंघावर कमांड मिळवली आहे. एकेक करीत सर्व संस्था ताब्यात घेतल्या आहेत. भाजपतील नेतेमंडळींचीही राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधण्यासाठी चढाओढ लागल्याचे दिसते आहे.BJP leader Namdev Raut will join NCP
कर्जत शहर व तालुक्यात मोठे राजकीय वजन असलेल्या नामदेव राऊत यांनी आज अधिकृतरित्या भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. राऊत यांचा राजीनामा भारतीय जनता पक्षासाठी मोठा धक्का मानला जातो आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून राऊत हे भाजपात नाराज असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी सरचिटणीस ढोकरीकर बंधूंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांच्यासोबतच कर्जत नगर पंचायतीचे नगरसेवकही होते. आता राऊत यांची पावलेही राष्ट्रवादीकडे वळल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले.
राऊत यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. रोहित पवार यांनी राष्ट्रवादीची ताकद कर्जत आणि जामखेड मतदारसंघात निर्माण केली आहे. राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास पक्षाची ताकद अनेक पटींनी वाढेल. कर्जत शहरात राष्ट्रवादीची ताकद नगण्य होती. परंतु आता ती वाढणार असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. आगामी नगर पंचायत ताब्यात घेण्याच्या इराद्यानेच राष्ट्रवादी कामाला लागली आहे. राऊत यांच्या राजीनाम्याने भाजपचे वर्तुळ चिडीचूप झाले आहे. BJP leader Namdev Raut will join NCP
कोण आहेत राऊत
नामदेव ऊर्फ देवा राऊत हे लढवय्ये नेते आहेत. त्यांची राजकीय जीवनाची सुरूवात शिवसेनेतून झाली. केवळ कामाच्या बळावर त्यांनी राजकीय मुसंडी मारली. शिवसेनेतही त्यांचे मोठे प्रस्थ होते. परंतु नंतरच्या राजकीय घडामोडीत ते भाजपवासी झाले. राम शिंदे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. कर्जत नगर पंचायतीवर त्यांची एकहाती सत्ता आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. संस्थांच्या माध्यमातून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रही त्यांनी व्यापले आहे. कर्जत नगर पंचायतीचे नगराध्यक्षपदी त्यांनी भूषवले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.