MAHARASHTRA VIDHAN PARISHAD ELECTION 2026: SUNETRA PAWAR MEETS DEVENDRA FADNAVIS, POLITICAL BUZZ INTENSIFIES Saam Tv
महाराष्ट्र

Vidhan Parishd Election : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची पाऊण तास खलबतं; राष्ट्रवादीच्या उमेदवारावर अखेर शिक्कामोर्तब?

Vidhan Parishd Election 2026 : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’वर भेट. राष्ट्रवादी आणि शिंदे गटात उमेदवारांवर चर्चा सुरू असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Alisha Khedekar

  • सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’वर महत्त्वाची भेट

  • राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारांबाबत चर्चांना वेग

  • शिंदे गटात निलम गोर्हे आणि बच्चू कडू यांची नावे चर्चेत

  • विधान परिषद निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. काही पक्षांनी उमेदवारांची घोषणा सुरू केली असताना, अनेक पक्षांमध्ये अजूनही चर्चेचे फेरे सुरू आहेत. भाजपनंतर आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उबाठाकडून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. मात्र, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. याच दरम्यान एक महत्त्वाची राजकीय भेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या अधिकृत निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सुमारे पाऊणतास चाललेल्या या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीचा नेमका अजेंडा समोर आलेला नसला तरी विधान परिषद निवडणुकीशी त्याचा संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मंगळवारी (२८ एप्रिल) महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये फोनद्वारे चर्चा झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून माजी आमदार झीशान सिद्दिकी यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी दिवसांत राष्ट्रवादीकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटातही हालचाली वेगाने सुरू आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उशिरापर्यंत बैठक झाली. या बैठकीत विधान परिषदेसाठी निलम गोर्हे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. तर दुसऱ्या जागेसाठी बच्चू कडू यांच्या नावावर चर्चा सुरू असल्याचे समजते. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस १२ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय समीकरणे स्पष्ट होण्याची शक्यता असून कोणाला उमेदवारी मिळते, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'50 कोटींचं डील, 15 कोटी अ‍ॅडव्हान्स'; खासदारांना हमीभाव, संजय राऊतांचा आरोप

Omraje Nimbalkar: हक्काचे खासदार ओमराजेंनी का सोडली ठाकरेंची साथ?, 'कोर्टाच्या निकालासाठी ओमराजे फुटले'

ठाकरेंपाठोपाठ पवारांचेही खासदार फुटणार? राष्ट्रवादीचे 3 खासदार NDAच्या संपर्कात?

Operation Tiger: पुन्हा शिवसेना फोडली! 6 खासदाराचं शिंदेसेनेत विलिनीकरण होणार? खासदारांच्या अपात्रतेसाठी ठाकरेसेनेची रणनीती

Operation Tiger: ४ वर्षांनंतर पुन्हा राजकीय भूकंप, ठाकरेसेनेचे ६ खासदार शिंदेसेनेच्या वाटेवर; वाचा'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT