Fadnavis Speech on Maharashtra Din
Fadnavis Speech on Maharashtra Din Saam Tv
महाराष्ट्र

Fadnavis Speech on Maharashtra Din: उपमुख्यमंत्र्यांनी विकासकामांचा वाचला पाढा, राज्याची अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्याचाही मानस

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Devendra Fadnavis News: आज ६३ वा महाराष्ट्र दिन आहे. आजचा हा दिवस ‘कामगार दिन’ म्हणून केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील 80 पेक्षा अधिक देशात साजरा केला जातो. १ मे १९६० साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. हा दिवस मराठी माणूस मोठ्या उत्साहाने साजरा करतो. शिवाय या दिवशी कामगार दिनही साजरा करण्यात येतो. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. (Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाराष्ट्र दिनासह कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सरकार शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी राबवत असलेल्या योजनांची माहिती दिली. नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, 9 महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले आणि राज्याने विविध क्षेत्रात प्रगती केली. निसर्गाच्या लहरीपणा मुळं शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकरी सन्मान योजनेचा फायदा शेतकऱ्यांना झाला. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत देणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. शेतकरी समृद्धीसाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत.

केंद्र सरकारनं किसान सन्मान निधीच्या माध्यमातून वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्याला (Farmer) मदत करण्यासाठी विविध योजना सुरु केल्याचे फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांना आता विम्यासाठी पैसे भरण्याची गरज नाही. एक रुपयात विमा भरण्याचा निर्णय आपण घेतला आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून शेती शाश्वत झाली पाहिजे असा सरकारचा प्रयत्न आहे. यातून शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल हा आमचा प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले. 

एसटी बसच्या तिकीटामध्ये महिलांना ५० टक्के सवलत देण्यात आलीय. मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे अशी योजना आणली. जलयुक्त शिवार 2 सूरु करण्यात येत आहे. यावर्षी १० लाख घरं बांधण्याचा निर्धार करण्यात आला आहे. शेतीसाठी आपण अनेक निर्णय घेतले. पंतप्रधान आवास योजनेतून अनेकांना घरं दिली अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून तब्बल ३१७ ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहेत. त्याच्या आज उद्घाटन करण्यात येत आहे. नागपूरात देखील 14 दवाखाने सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र हा प्रगतिशील राहिलाच आहे, मात्र अधिक प्रगती करायचा आहे. यासाठी महाराष्ट्र सरकार कार्यरत राहील. महाराष्ट्र असाच प्रगती कडे जात राहो अशी प्रार्थना देखील फडणवीस यांनी यावेळी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Loksabha Election: मतदान ड्युटी करताना पोलिंग एजंट मनोहर नलगे यांचा मृत्यू

Maharashtra Lok Sabha Voting Live: नाशिकमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली, 61 टक्के मतदानाची नोंद

Special Report | उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदा पंजाला तर राज ठाकरेंचं 19 वर्षांनी धनुष्यबाणाला मत

KKR vs SRH: हैदराबाद की कोलकाता; नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी कोणाला मिळवून देणार फायनलचं तिकीट?

Special Report | 12वीचा निकाल कुठे पहायचा? हा प्रश्न पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे

SCROLL FOR NEXT