Prakash Ambedkar SaamTvNews
महाराष्ट्र

फडणवीसांनी पेन ड्राईव्ह सर्वांसमोर आणावा, नुरा कुस्ती खेळू नये- आंबेडकर

त्यांनी जो पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना दिला आहे त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही.

लक्ष्मण सोळुंके

जालना: देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात नुरा कुस्ती खेळू नये, तेल लावलेल्या पैलवानासारखी मैदानात येऊन खेळावी, विधानसभा अध्यक्षाना (Maharashtra Assembly Live) दिलेला पेन द्राईव्ह फडणवीस यांनी जनतेसमोर आणावा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. औरंगाबादमध्ये (Aurangabad) आज प्रकाश आंबेडकर यांची सभा आयोजीत करण्यात आली आहे. मात्र या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दरम्यान जालन्यातील कार्यक्रम संपल्यानंतर मी औरंगाबादला जाणार असून तिथे गेल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून तेथील सभा घ्यायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज देखील सभागृहात गोंधळ घातला असून त्यांनी सभागृहात का नुरा कुस्ती खेळली असा सवाल करत त्या कुस्तीतुन काहीही निष्पन्न होणार नाही. त्यांनी जो पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना दिला आहे त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. हा पेन ड्राईव्ह उद्या फॉरेन्सिक लॅबला गेला की हा फेक आहे असाच रिपोर्ट येणार नाही. त्यामुळे हा पेनड्राईव्ह जनतेसमोर आणावा जेणेकरून फडणवीस यांची नुरा कुस्ती न होता खऱ्या अर्थाने तालमीतल्या पैलवानासारखी त्यांची कुस्ती होईल असंही आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नुरा कुस्तीतला पैलवान व्हायचं की तालमीतला पहेलवान व्हायचं हे फडणवीस यांनी ठरवायचं आहे असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

फडणवीस आणि भाजपने सभागृहात नुरा कुस्ती न खेळता तेल लावलेल्या पैलवानासारखी मैदानात कुस्ती खेळावी असंही आव्हान त्यांनी दिलं आहे. फडणवीस यांनी पेनड्राईव्ह जनतेसमोर आणल्यास सिक्रेसी कायद्याचं उल्लंघन बिलकुल होणार नाही असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT