Rajstan Police
Rajstan PoliceSaam TV

हस्तिदंताची तस्करी करणाऱ्या PSI ला रंगेहाथ पकडले, करोडोंचा मुद्देमाल जप्त

या प्रकरणाशी संबंधित अन्य लोकांची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या रॅकेटचाही खुलासा होऊ शकतो, असे मानले जात आहे.
Published on

राजस्थानमध्ये स्पेशल ऑपरेशन ग्रुपने हस्तिदंताची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. एसओजीच्या या कारवाईत रविवारी उत्तर प्रदेश पोलिसांच्या (uttar pradesh police) उपनिरीक्षकासह तीन जणांना जयपूर येथून 35 हत्तींच्या दातांसह अटक करण्यात आली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हस्तिदंताचे वजन 30 किलो इतके सांगितले जात आहे. सध्या एसओजीचे पथक अटक केलेल्या आरोपींची चौकशी करत आहे. या प्रकरणाशी संबंधित अन्य लोकांची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या रॅकेटचाही खुलासा होऊ शकतो, असे मानले जात आहे.

एसओजीने उत्तर प्रदेशातील हरदोई पोलिसांच्या (up police sub-Inspector ) नझुद्दीन आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. हस्तिदंत, दीड लाख रोख आणि शस्त्र बाळगल्याप्रकरणी नझुद्दीन आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. टीमने सांगितले की, तिघे आरोपी स्कॉर्पिओमधून जयपूर शहरात फिरत होते, त्यावेळी त्यांना पकडण्यात आले.

Rajstan Police
IPL 2022: संघांना मोठा धक्का! कोटीत घेतलेले धुरंधर राहणार काही सामने बाहेर

गुप्त माहितीवर आधारित कारवाई

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, आरोपींना पकडण्यासाठी राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो यांनी संयुक्त कारवाई केली होती, ज्या अंतर्गत या आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपींबाबत गुप्त माहिती मिळाली होती, त्यानुसार हस्तिदंत आणि वाघाचे कातडे घेऊन जाण्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर जयपूरच्या जलुपुरा भागात एक एसयूव्ही कार थांबवून त्याची झडती घेण्यात आली.

हस्तिदंत, पावडर आणि रिव्हॉल्व्हर जप्त

एसओजीच्या अधिकृत निवेदनानुसार, पोलिसांनी आरोपींकडून तपासादरम्यान एका वाहनातून 35 हस्तिदंत, 165 ग्रॅम हस्तिदंती पावडर, 6 काडतुसे असलेले एक लोड केलेले रिव्हॉल्व्हर आणि रोख 1.50 लाख रुपये जप्त केले. पोलिसांचे म्हणणे आहे की, मुख्य आरोपी उत्तर प्रदेशातील हरदोई पोलिस लाइन्समध्ये उपनिरीक्षक आहे. तो आणि त्याच्या दोन साथीदारांसह आहे. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी सांगितले की, तिन्ही आरोपी जयपूर येथे हस्तिदंत विकण्यासाठी आले होते, त्याबाबत अधिक चौकशी सुरू आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com