CM Devendra Fadnavis On Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

'तुम्ही एक दिवस मुख्यमंत्री नक्की होणार'; पवारांना शुभेच्छा देत फडणवीसांनी सांगितला सरकारचा २४ तासांचा शिफ्ट प्लान

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, असं म्हटलंय. त्याचबरोबर फडणवीस यांनी तीन शिफ्टच्या कामाचे वेळापत्रक मांडले आहे.

Bharat Jadhav

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार एक दिवस नक्कीच मुख्यमंत्री होतील, असं विधान खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. अजित पवार यांना ते विधानसभेत बोलत होते. फडणवीस यांनी अजित पवार यांना शुभेच्छा देताना सरकारच्या तीन शिफ्टच्या कामाचं वेळापत्रक मांडलं. अजित पवार हे लवकर उठणारे आहेत तर ते सकाळच्या शिफ्टमध्ये काम करतील. मुख्यमंत्री दुपारी १२ ते मध्यरात्री काम करणार आहेत.

तर एकनाथ शिंदे हे रात्री उशिरापर्यंत काम करतील, असं फडणवीस म्हणाले. विधानसभेत चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं. अजित पवार यांच्याकडे वळून ते म्हणाले, "तुम्हाला 'कायम उपमुख्यमंत्री' म्हणतात. पण माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत... तुम्ही एक दिवस मुख्यमंत्री व्हाल." अशा शुभेच्छा त्यांनी अजित पवारांना दिल्या.

मी आधुनिक अभिमन्यू - फडणवीस

मी आधुनिक अभिमन्यू आहे. मला चक्रव्यूह भेदता येतो. पण तो भेदून मी आज या जागेवर उभा आहे. याचे श्रेय माझ्या पक्षाचे, सहकारी पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी आहे, मित्रपक्ष, महाराष्ट्र जनतेचे श्रेय आहे. म्हणून एवढेच म्हणेन की, 'आँधी यो में भी जो जलता हुआ मिल जाएगा, उस दिए सें पुछना मेरा पता मिल जाएगा...

सभागृहाला आश्वस्त करतो. कोणतीही शंका मनात नको. जी आश्वासनं, योजना. एकही योजना बंद होऊ देणार नाही. लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं ते अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबरचा हप्ता त्यांच्या खात्यात टाकतो. कुठलेही निकष नाहीत. आता सगळ्यांनाच टाकतो. काहींनी चार चार खाती उघडली आहेत. एखादी योजना चुकीच्या पद्धतीने वापरत असेल तर तो योग्य प्रकारे गेला पाहिजे. माणसानेच ९ खाती टाकली.

बहिणींच्या पैशांवर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा, असे जे आहेत त्यावर कारवाई होणार असल्याचं फडणवीस म्हणाले. शेतकरी आश्वासने, युवा, ज्येष्ठ, वंचित यांना दिलेली आश्नासनं पूर्ण करणार आहोत. अभूतपूर्व कौल मिळालाय. त्याच्यावरही किती उसळण्याचं काम झालं. नानाभाऊ तुम्ही वकील व्हायला हवं होतं. अतिरिक्त ७४ लाख मतं आली कुठून... तुम्ही फेक नरेटिव्ह फॅक्टरी उभी करण्याचं काम करत आहात, ती उद्ध्वस्त करण्यासाठी मी आलोय, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान अजित पवार यांनी ५ डिसेंबर रोजी सहाव्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रिपद मिळालं नसल्याने अजित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पाडत भाजपसोबत सत्तेत हातमिळवणी केली. त्यानंतरच्या कायदेशीर वादात अजित पवार गटाने पक्षाचे नाव आणि 'घड्याळ' चिन्ह दोन्ही मिळवलं. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आलीय तर अजित पवार यांच्या पक्षाने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उल्लेखनीय पुनरागमन करत ५७ पैकी ४१ जागा जिंकल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT