Uddhav Thackeray and Devendra Fadnavis  SAAM TV
महाराष्ट्र

Devendra Fadnavis News : उद्धव ठाकरे नैराश्यात, ते डोकं बिघडल्यासारखं बोलले; देवेंद्र फडणवीसांकडून प्रत्युत्तर, VIDEO

Devendra Fadnvis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे नैराश्यात असून ते डोक बिघडल्यासारखं बोलले आहे. त्यांच्या टीकेला फार काही उत्तर द्यायचं नसतं, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

नागपूर : पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर ठाकरेंनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'उद्धव ठाकरे नैराश्यात असून ते डोकं बिघडल्यासारखं बोलले. त्यांच्या टीकेला फार उत्तर द्यायचं नसतं, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस हे सध्या नागपुरात आहेत. नागपुरात त्यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. 'उद्धव ठाकरे यांचा ताबा सुटला आहे. ते अत्यंत नैराश्यात असल्याने अशा प्रकारचे शब्द वापरत आहेत. जेव्हा एखादा व्यक्ती नैराश्यात असतो. तो व्यक्ती अशा प्रकारचं डोकं बिघडल्यासारखं बोलतो. त्याला फार उत्तर द्यायचं नसतं, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. ते औरंगजेब फॅन क्लबचे आहेत, हे त्यांनी आता दाखवून दिलं आहे, अशीही टीका फडणवीसांनी केली.

सचिन वाझेने अनिल देशमुख यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केला. वाझेच्या आरोपांवरही फडणवीसांनी भाष्य केलं. 'सचिन वाझेने मला पत्र पाठवल्याचं मी माध्यमातून ऐकलं आहे. मी ते पाहिलेलं नाही. कारण मी दोन दिवसापासून नागपुरात आहे. जे काही समोर येत आहे, त्याची चौकशी करू, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रवीण दरेकरांकडून प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं. 'उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडल्याचं दिसलं. दोन दिवसांपूर्वी रंगशारदा येथे मेळावा झाला. तेव्हा वाटलं अर्धवट बिघडलं. मात्र आज पूर्णपणे त्यांच्यातला माणूस संवेदनाहिन झाल्याचं दिसलं. वैफल्यातून एखादा माणूस बोलत असतो, असा त्यांचा केविलवाणा प्रयत्न दिसत आहे. उद्धव ठाकरे दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांवर बोलले. त्यांचे त्यावर समाधान झालं नाही. त्यामुळे आता अमित शाहांवर टीका करत आहेत. आम्हाला राजकीय संस्कार आहे, त्यामुळे वाईट बोलत नाही, अशी टीका दरेकरांनी केली.

'विकृत मानसिकतेचा माणूस असंच बोलू शकतो. मनगटात ताकद पाहिजे ना? राजकीय शक्तीचा देखील अंदाज घेतला जात नाही. नुसत्या तोंडाच्या वाफा आहेत. अमित शहांचा अवाका किती आणि तुमचा किती ते बघाय. बाळासाहेब यांची ताकद एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्यामुळे ढेकून काय मुंगी देखील मारु शकत नाही, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT