Devendra Fadnavis Reaction on Samriddhi Highway Accident: ठाण्यातील शहापूर तालुक्यात सोमवारी रात्रीच्या सुमारास एक भयानक घटना घडली. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम सुरू असताना, अचानक पुलावरून ग्रेडर मशिन कोसळला. या भीषण अपघातात आतापर्यंत १७ कामगारांचा मृत्यू झाला. तर ४ ते ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत दु:ख व्यक्त केलं. "शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत."
"या घटनेत 3 कामगार जखमी झाले. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत", असं ट्वीट करत घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.
दुसरीकडे राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा समृद्धी महामार्गावरील दुर्घटनेवर ट्वीट करत दु:ख व्यक्त केलं. "शहापूर तालुक्यातील सरलंबे येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील काम सुरु असताना घडलेल्या दुर्घटनेत मजुरांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे".
"पुलाचं काम सुरू असताना गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्यानं हा अपघात झाला. बचावकार्य युद्धपातळीवर राबवलं जात आहे. जखमींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना. मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो", असं ट्वीट अजितदादांनी केलं आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.