राणेंच्या वक्तव्याला समर्थन नाही पण संपूर्ण भाजप राणेंच्या पाठीशी : फडणवीस  Saam Tv
महाराष्ट्र

राणेंच्या 'त्या' वक्तव्याला समर्थन नाही पण संपूर्ण भाजप राणेंच्या पाठीशी : फडणवीस

राणेंच्या वक्तव्याचे असमर्थन करतानाच संपूर्ण भाजप केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या पाठीशी असल्याची जाहीर भूमिका फडणवीसांनी घेतली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कानशिलात लगावण्याच्या वादग्रस्त वक्तव्याने महाराष्ट्राचे राजकीय वातारण चांगलेच तापले आहे. संपूर्ण राज्यभरातून महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेकडून जोरदार समाचार घेतला जात आहे. राज्यभरात ठिकठिकाणी राणेंचे पुतळे जाळले जात आहेत आणि त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.

हे देखील पहा -

आज, राणेंच्या 'त्या' वक्तव्याबाबत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण भाजपच्या वतीने असहमती दर्शवली असून राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांबद्दल राणेंचे वक्तव्य समर्थनीय नसल्याचे म्हटले आहे. मात्र, सोबतच राणेंच्या वक्तव्याचे असमर्थन करतानाच संपूर्ण भाजप केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या पाठीशी असल्याची जाहीर भूमिका फडणवीसांनी घेतली आहे.

मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, मुख्यमंत्री यांच्या बाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जे वक्तव्य केले यामुळे वाद निर्माण झाला आहे. माझ्या मते बोलण्याच्या भरात त्यांच्याकडून वाक्य निघून गेले असावे. परंतु, नारायण राणे यांच्या मनात असे काही नसेल बोलण्याच्या ओघात हा प्रकार घडल्याची पुष्टी त्यांनी जोडली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT