Devendra Fadnavis's reaction to Supreme Court decision saam tv
महाराष्ट्र

Supreme Court Verdict : सुप्रीम कोर्टाच्या निकालातील या 6 मुद्यांवर देवेंद्र फडणवीसांनी वेधलं लक्ष; उद्धव ठाकरेंनाही मारले बाण...

Maharashtra Political Crisis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रीम कोर्टाच्या काही महत्त्वाच्या निर्णयावर लक्ष वेधलं. कोणते आहेत ते मुद्दे पाहुयात.

Chandrakant Jagtap

Devendra Fadnavis's reaction to Supreme Court decision: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी 'सरकार तर आता सेटल झालं, हा लोकशाही आणि लोकमताचा पूर्णपणे विजय आहे अशी प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या काही महत्त्वाच्या निर्णयावर लक्ष वेधलं. कोणते आहेत ते मुद्दे पाहुयात.

'ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री होता येणार नाही'

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर पूर्णपणे पाणी फेरलेय. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले स्टेटस्को अँटी करता येणार नाही. उद्धव ठाकरेंना त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करता येणार नाही.

'अपात्रतेचे अधिकार अध्यक्षांकडे'

फडणवीस म्हणाले. अपात्रतेच्या याचिकांसदर्भातील सर्व अधिकार अध्यक्षांकडे आहे. (निकाल वाचून दाखवला) सुप्रीम कोर्टाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. अध्यक्षांना सर्व अधिकार दिले आहेत. १० व्या सूचीनुसार राजकीय पक्ष कुठले आहे हे ठरवण्याचे अधिकार अध्यक्षांना आहेत. आता अपात्रतेचा निर्णय अध्यक्ष घेतील असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

'निवडणूक आयोगाला पूर्ण अधिकार'

निवडणूक आयोगाला पूर्ण अधिकार आहेत, हे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे. निवडणूक आयोग अपात्रतेसंदर्भात पूर्ण स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतं. त्यांनी केलेल्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे गटाने केला होता. तो पूर्ण चुकीचा आहे हे यातून स्पष्ट झाले आहे. सगळे अधिकार हे निवडणूक आयोगाचे आहेत. त्यात कुठलीही बाधा नाही हे निकालात स्पष्ट सांगितले आहे.

'हे सरकार पूर्णपणे कायदेशीर'

देवेंद्र पडणवीस म्हणाले, काही लोक या सरकारला घटनाबाह्य म्हणत होते. परंतु आता सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर हे सरकार पूर्णपणे घटनात्मक असल्याचं सिद्ध झालं आहे. हे सरकार पूर्णपणे कायदेशीर आहे, आधीही होतं. काहींना शंका होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शंकांचं निरसन झालं असावं, अर्थात ते मानत असतील तर असा टोला देखील त्यांनी ठाकरेंना लगावला आहे. (Maharashtra Political News)

'तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती'

देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद बघितली. त्यात ते म्हणाले की नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला. मग भाजपसोबत निवडून आला आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेला तेव्हा नैतिकता कुठे डब्यात बंद करून ठेवली होती. नैतिकतेचा मुद्दा त्यांनी सांगू नये. (Latest Political News)

'तुम्हाला कुठलाही नैतिक अधिकार नाही'

तुमच्याकडे नंबर नाहीत, हरणार आहात, लोक तुम्हाला सोडून गेलेत, तुम्ही भीतीपोटी राजीनामा दिला. विनाकारण त्याला नैतिकतेचा मुलामा चढवण्याचा प्रयत्न करू नका असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच तुम्ही खुर्चीकरता विचार सोडला, एकनाथ शिंदेनी विचारासाठी खुर्ची सोडली. त्यामुळे त्यांनी शिंदेंच्या राजीनाम्याचं बोलूच नये, असा टोला देखील फडणवीस यांनी ठाकरेंना लगावला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पन्नास हजार मताच्या फरकाने निवडून येणार-माधुरी मिसाळ

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT