Devendra Fadnavis Delhi Rumours saam tv
महाराष्ट्र

देवेंद्र फडवणीस दिल्लीत जाण्याच्या चर्चेनंतर भाजपच्या बड्या नेत्याची बॅनरबाजी, देवा भाऊंच्या नेतृत्वात...;

Nanded BJP Leader Mahesh Khomne Banners In Support Of Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्याच्या चर्चांना नांदेडमध्ये भाजप समर्थकांनी बॅनरबाजीतून उत्तर दिलं आहे. काल, आज आणि उद्या देवा भाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार असा संदेश देत विरोधकांवर निशाणा साधण्यात आला.

Omkar Sonawane

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेड: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावरून नांदेडमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी सुरू केली. ढोंगी हितचिंतकांनी काळजी करू नये, काल आज आणि उद्या देवा भाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार अशा आशयाचे बॅनर शहरात लावण्यात आले. पक्ष योग्यवेळी योग्य निर्णय घेईल, तूर्तास काळजी नसावी असा उल्लेख देखील बॅनरवर करण्यात आला आहे.

भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश खोमणे यांनी हे बॅनर लावले. देवा भाऊंच्या नेतृत्वात राज्याचा विकास होतो आहे. त्यामुळे विरोधकांना या राज्यात संधी मिळत नाही आणि भविष्यातही दिसत नाही. त्यामुळे संजय राऊत, विजय वडेट्टीवार हे नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असा भ्रम पसरवत आहेत. या नेत्यांना त्याची जागा दाखवण्यासाठी हे बॅनर लावले असं महेश खोमणे म्हणाले.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील अनेकवेळा फडणवीस हे दिल्लीत जातील असे सुतोवाच करत असतात. तसेच आज आज कॉँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार हे देखील म्हणाले की फडणवीस पंतप्रधान व्हावे अशी आमची इच्छा आहे.

या सगळ्याला आज नांदेडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी बॅनरमधून उत्तर दिले आहे. बॅनरमधून जरी देवेंद्र फडणवीस राज्यात राहतील असे सांगितले असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजूनतरी यावर स्पष्टीकरण दिले नाहीये. मागच्या काही दिवसांपासून फडणवीसांच्या दिल्लीवारी वाढत असल्याने तर्क वितर्क लावले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जरांगे एकटेच मुंबईला येणार, परवानगी नाकारल्यानं जरांगेंचा गनिमीकावा?

दिशा सालियन प्रकरणात गुन्हा दाखल; मुख्य आरोपींमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव

Car Insurance : कार इन्शुरन्स क्लेम होऊ शकतो रद्द; चुकूनही करू नका या १० चुका

उद्धव ठाकरे पुढच्या वर्षी मुख्यमंत्री होणार! बड्या नेत्याच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: कोल्हापुरात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात

SCROLL FOR NEXT