Devendra Fadnavis SAAM TV
महाराष्ट्र

राज ठाकरे इतकी भाबडी अपेक्षा ठेवतील वाटलं नव्हतं- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक: राज ठाकरेंनी (Raj Thackeray) राज्य सरकारकडून अपेक्षाच ठेवू नये. इतकी भाबडी अपेक्षा राज ठाकरे ठेवतील, असं वाटल नव्हतं. हे सरकार लांगूलचालन करतंय, या सरकारने मर्यादा सोडल्यात आहेत. हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर जे राजद्रोहाचा गुन्हा लावून खासदार, आमदारांना १२ दिवस जेलमध्ये ठेवतात, त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा ठेवणं पूर्ण चुकीचं. राज्यसरकार विरोधात आम्ही लढतोय, राज ठाकरेंनी पण लढलं पाहिजे असे मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले आहे.

फडणवीसांनी यावेळी शरद पवारांवरतीही टीका केली आहे. शरद पवारांनी महाराष्ट्रातल्या प्रश्नांकडे लक्ष दिलं तर अधिक चांगलं होईल. पवारांच्या बहुमूल्य सल्ल्याची आवश्यकता श्रीमान उद्धव ठाकरेंना आहे, त्यांना त्यांनी तो द्यावा असे फडणवीस म्हणाले आहेत. राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशमधिल अयोध्येचे खासदार ब्रीज भूषण यांनी विरोध केला आहे. त्यावर फडणवीस म्हणाले त्यांच्या विरोधाचं कारण मला माहित नाही. रामाच्या शरणात जो जात असेल त्याला जाऊ दिलं पाहिजे, रामाच्या शरणात जाण्यापासून कुणाला रोखण्याचे काही कारण नाही, अस माझं मत आहे असेही फडणवीस म्हणाले आहेत.

मुंबईत उत्तर प्रदेश सरकारचे कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. उत्तर प्रदेश सरकारने मुंबईत ऑफिस सुरू केलं तर लगेच घाबरून जाण्याची गरज नाही. मुंबई आणि महाराष्ट्र पावरफुल्ल आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या कार्यालयाचा काहीही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT