Fadnavis Meets Thackeray Saam Tv News
महाराष्ट्र

Devendra Fadnavis Raj Thackeray: राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली? मुख्यमंत्र्यांनी सगळं सांगितलं

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना भेटण्यामागचं कारण स्पष्ट केलं. 'ही भेट राजकीय नव्हती, ब्रेकफास्ट केलं, गप्पा मारल्या', असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Bhagyashree Kamble

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात खलबतं सुरू आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. त्यातच राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना भाजप राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीमागचं कारण स्पष्ट केलं आहे. 'ही भेट राजकीय नव्हती, ब्रेकफास्ट केलं, गप्पा मारल्या', असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात एक मोठी घडामोड घडली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात जाण्यापूर्वी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच 'शिवतीर्था'वर जात राज ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री यांनी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट अँड गाईड हॉलमधील शिवाजी पार्कमध्ये परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र, त्यापूर्वी मुख्यमंत्री यांनी राज ठाकरे यांच्या निवास्थानी जात भेट घेतली.

या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. अमित ठाकरे यांना भाजप राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना राज ठाकरे यांना भेटण्यामागचं कारण सांगितलं.

राजकीय भेट नव्हती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'ही कुठलीही राजकीय भेट नव्हती. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांचा फोन आला होता. त्यांनी अभिनंदन केलं. अभिनंदनाचा फोन आल्यानंतर त्यांना मी सांगितलं की, मी त्यांच्या घरी येईन. त्याप्रमाणे मी आज त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. भेट झाल्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही गप्पा मारल्या. या भेटीचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. मैत्रीकरिता मी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली', असं फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT