Devendra Fadnavis Saam TV
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: लव्ह जिहाद प्रकरणी फडणवीसांच मोठं वक्तव्य; म्हणाले, 'आंतरजातीय लग्नाला आम्ही प्रोत्साहन देऊ इच्छितो'

राज्य सरकारने स्थापन केलेली समिती आंतरजातीय विवाहांसाठी नाही, तर आंतरधर्मीय विवाहांसाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Devendra Fadnavis: गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. या मुद्द्यावरून राजकारण देखील तापलेलं दिसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरजातीय लग्नाला प्रोत्साहन देण्याच विधान केलं आहे. लव्ह जिहाद बाबत कायदा पारित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कायद्यामुळे आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते असे काहींचे मत आहे. त्यामुळे फडणवीसांनी यावर सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. (Latest Marathi News)

आम्ही आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देऊ इच्छित आहोत. राज्य सरकारने स्थापन केलेली समिती आंतरजातीय विवाहांसाठी नाही, तर आंतरधर्मीय विवाहांसाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. एका वृत्तसंस्थेच्या आयोजित कार्यक्रमात त्यांनी या कायद्याविषयी माहिती दिली आहे.

आंतरजातीय विवाहासाठी वेगळी समिती

लव्ह जिहाद बाबत असलेल्या समितीविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज्य सरकारने स्थापन केलेली समिती आंतरजातीय विवाहांसाठी नाही, तर आंतरधर्मीय विवाहांसाठी आहे. आम्ही आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देऊ इच्छितो. आंतरजातीय विवाहासाठी आमची वेगळी समिती आहे. " सरकार आंतरधर्मीय विवाहाच्या विरोधात नसल्याचे देखील ते या वेळी म्हणाले.

"सध्या अशा अनेक घटना घडत आहेत, ज्यामध्ये आंतरधर्मीय विवाह झाल्यानंतर सहा - सात महिन्यात मुलगी घरी परत येते. तिची फसवणूक होते. असं एखादं-दुसरं प्रकरण घडलं असतं तर ठीक आहे. प्रत्येक जातीत किंवा धर्मात असं घडताना दिसत आहे. तसेच काही ठिकाणी अशा प्रकरणांच्या संख्येत वाढ होत असून हा आकडा धोक्याची घंटा ठरतो आहे. यामुळे धार्मीक एकोपा कमी झाल्याचे चित्र दिसत आहे, असे फडणवीसांनी सांगितले.

सत्य स्विकारावेच लागेल

पत्रकारांशी बोलताना फडणवीस पुढे म्हणाले की, 'चार ते पाच वर्षांपूर्वी तुम्ही मला विचारलं असतं तर लव्ह जिहाद सारख्या काही गोष्टी अस्तित्वात नाहीत, असं माझं उत्तर असतं. मात्र वारंवार ज्या पद्धतीने या घटना समोर येत आहेत ते पाहता आता शांत बसून जमणार नाही. आम्ही धर्मनिरपेक्ष आणि आधुनिक विचारांचे आहोत फक्त एवढं बोलून चालणार नासल्याचं सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. '

लव्ह जिहाद समिती नेमकी कशासाठी?

कुठल्याही धर्माच्या (Religion) व्यक्तींना थांबवण्यासाठी किंवा दोन धर्मात लग्नच (Marriage) होऊ नयेत, यासाठी आम्ही ही समिती तयार केली नसल्याचे फडणवीसांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, ' असे लग्न होत असताना त्यामागे काहीतर कट शिजताना दिसत आहे का? तसे दिसत असल्यास संबंधितांवर कोरवाई व्हावी असे आम्हाला वाटते. त्यासाठी आम्ही इतर राज्यांत यावर घेतलेल्या निर्णयाचा अभ्यास करून आम्ही आमचा निर्णय घेणार आहेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाने महाराष्ट्राची चिंता वाढली, मुरबाडमधील ११२ पर्यटक अडकले

Nepal Protest: नेपाळमध्ये जे घडलं ते भारतातही घडेल; खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची बीडच्या शृंगार वाडीत सभेचे आयोजन सभेची जोरदार तयारी

Solapur Firing : राज्यात चाललंय काय? गाणी लावण्याच्या वादातून राडा; थेट कला केंद्रात गोळीबार

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात, माजी सरपंच आणि नातीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT