गडचिरोली : आज गडचिरोली येथील जाहीर सभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'कोरोना काळात वेश्यांना देण्यात येणारे पैसे या लोकांनी आपल्या नातेवाईंकाना दिल्याचा गंभीर आरोप फडणवीसांनी यावेळी केला तसंच वेश्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे सर्वांना माहीतेय, संजय राऊत तो शब्द नेहमी वापरतच असतात अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.
तसंच 'धोक्यानं तयार झालेलं सरकार धोकाचं देतं, तुम्ही आम्हाला निवडून दिलं होतं मात्र, आमच्या पाठीत खंजीर खुपसून यांनी हे सरकार स्थापण केलं. त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खूपसू द्या; निदान तुमची तरी काळजी करायला हवा होती.' अशी टीकाही फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर केली.
ते म्हणाले, ठाकरे सरकारला बेवड्याची चिंता जास्त आहे. सरकारनं हिम्मत असेल तर मुंबईतील टॅक्स गोळा करुन दाखवा असं आवहान त्यांनी यावेळी केलं. तसंच सामान्य माणसाला त्रास देणाऱ्या सरकारला वठणीवर आणणार, जे सरकार धोक्यानं आलं ते धोकाचं देणार, धान खरेदीत भ्रष्टाचार सुरु आहे. धान उत्पादकांना 100 ते 150 कोटींचा बोनस देता आला नाही या सरकारसाठी 100 कोटी काही जास्त रक्कम नाही तरीही सराकार शेतकऱ्यांना मदत करत नाही.
सरकारने बारमालकांना मदत केली, आमच्या पाठीत खंजीर खुपसला राज्यातील सरकार धोक्यानं आलेलं आहे त्यामुळे ते धोकाच करणार असा घणाघात त्यांनी यावेळी केला. आधी शेतकऱ्याची वीज तोडणार नाही म्हणाले मात्र त्यांनी गरीब शेतकऱ्यांची वीज (Farmers Electricity) तोडली, सामान्यांना तरी न्याय द्या असंही ते म्हणाले.
कोरोनाकाळात शिवसेनेच्या यशवंत जाधवांनी 400 कोटींची संपत्ती घेतली. यशवंत जाधव यांना भ्रष्टाचाराचे फक्त 10 टक्के मिळाले 90 टक्के कुठे गेले. ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) हे सरकार गंभीर नाही. या सरकारला ओबीसींचं आरक्षण नकोय असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.