Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Saamtv
महाराष्ट्र

Devendra Fadanvis: उपमुख्यमंत्री फडणवीसांचे कन्नड प्रेम! भाषणाला केली थेट कन्नडमधून सुरूवात, म्हणाले, 'कन्नड भाषा...'

Gangappa Pujari

Devendra Fadanvis: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र कर्नाटक सिमावादाचा प्रश्न चांगलाच तापला होता. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी चिथावणीखोर वक्तव्ये करत हा वाद तापवला होता. ज्यानंतर राज्यातील विरोधकही आक्रमक झाले होते.

राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा प्रचंड गाजला होता. अधिवेशनात सत्ताधारी पक्षावर याच मुद्द्यावरुन विरोधकांनी टिकास्त्र सोडले होते. हा वाद सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कन्नडमधील भाषण सध्या व्हायरल होत आहे. (Devendra Fadanvis)

याबाबत अधिक माहिती अशी की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कर्नाटकातील चिक्कमंगलुरू येथील सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. त्यावेळी कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी थेट कानडी भाषेतून भाषणाला सुरुवात केली.

यावेळी बोलताना त्यांनी कन्नड भाषेत मला चिक्क मंगलूरुमध्ये कार्यक्रमाला बोलावण्यासाठी सगळ्यांचे आभार, तसेच सर्वांना मकर संक्रातीच्या शुभेच्छा, असे म्हणत भाषणाला सुरूवात केली. त्यांच्या या कन्नड भाषेतील भाषणानंतर विरोधकांना पुन्हा एकदा टीकेची संधी मिळाली आहे.

त्याचबरोबर कार्यक्रमात पुढे बोलताना फडणवीसांनी "महाराष्ट्र-कर्नाटकचे फार जुने मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत. मराठीसह कन्नड भाषाही प्राचीन आणि समृद्ध भाषा आहे. दोन्ही भाषेतील साहित्य हे लोकांना दिशा देणारं आहे," असे म्हणत कौतुकही केले.

तसेच " आजपर्यंत मी देशातील अनेक शहरांमध्ये गेलेलो आहे. परंतु, चिक्कमंगलुरू इतकं सुंदर आणि स्वच्छ शहर मी कुठंही पाहिलेलं नाही. चिक्कमंगलुरूमध्ये दाखल झाल्यानंतर शहरातील स्वच्छता पाहून मी भारावून गेलो," असं म्हणत फडणवीसांनी चिक्कमंगलुरू महापालिकेचंही गोडवे गायले. (Karnataka )

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : तब्येतीमुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

SCROLL FOR NEXT