Maharashtra Political Crisis Saam TV
महाराष्ट्र

'हे वादळ दोन दिवसात शांत होईल, सरकार पडणार नाही; आमदारही परत येतील'

'आमदारांनी बंडखोरी केली आहे मात्र, त्यांचा आरोप खरा आहे की मुख्यमंत्री हे वेळ देत नव्हते.'

मंगेश मोहिते

नागपूर : राज्यात आत्ता सुरु असलेला प्रकार क्षणिक असून हे सर्व वादळ दोन दिवसात संपेल आणि गुवाहाटीला गेलेल आमदारही मागे येतील यात शंका नसल्याचा विश्वास अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (MLA Devendra Bhuyar) यांनी व्यक्त केला आहे. नागपूर विमानतळावरून मुंबईला निघाले असता भुयार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी सांगितलं, ' उद्या सिल्वर ओकवर (Silver Oak) बैठक आहे. त्या बैठकीसाठी मी मुंबईला निघालो आहे, शिवाय काळजी करु नका, मी गुवाहाटीला जाणार नाही, अशी मिश्कील टिप्पणी देखील भुयार यांनी यावेळी केली.

यावेळी माध्यमांनी सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी (NCP) एकनिष्ठ आहे. मला कितीही प्रलोभने दिली तरी मी त्यांच्यासोबत शिंदे गटासोबत जाणार नाही. तसंच माझा प्रवास ठरलेला आहे, तो प्रवास सिल्वर ओकचा आहे. महाविकास आघाडी एक विचार घेऊन जन्माला आलेली आहे.

हे देखील पाहा -

मुख्यमंत्र्याना (Uddhav Thackeray) प्रशासकीय अनुभव कमी आहे. काही लोकांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क होऊ दिला नाही. तसंच यावेळी सेनेच्या आमदारांकडून राष्ट्रवादीकडून करण्यात येणाऱ्या निधीवाटपातील दुजाभाव याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'राष्ट्रवादीचा काहीही संबंध नाही, प्रत्येक मंत्र्याच्या खात्याचा परफॉर्मन्स बघा, शिवाय आमदारांच्या परफॉर्मन्सवरती भरीव निधीसाठी तरतुद करायची की नाही हे ठरत. मात्र, काम करायची नाहीत सत्ता भोगायची आणि खापर फोडायचं असा टोलाही त्यांनी नाराज शिवसेनेच्या आमदारांना लगावला.

तसंच शिवसेनेतील (Shivsena) आमदारांनी बंडखोरी केली आहे मात्र, त्यांचा आरोप खरा आहे की मुख्यमंत्री हे वेळ देत नव्हते आणि नाराजी मी पहिल्यांदा बोलून दाखवली होती. त्यासाठी हे पाऊल उचलण्याची गरज नाही. हे वादळ दोन दिवसात शांत होईल आणि सरकार पडणार नाही असं त्यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT