money fraud case saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar News: छ. संभाजीनगरमध्ये आदर्श पतसंस्था घोटाळ्याची पुनरावृत्ती? 'देवाई'तील गोरगरीब खातेदारांच्या ठेवीवर डल्ला

Chhatrapati Sambhajinagar News: 'देवाई' नागरिक पतसंस्थेतील काही खातेदारांनी ठेवी बुडवल्याचा आरोप केल्यानंतर शहरातील सर्वच खातेदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

Chhatrapati sambhajinagar Latest News:

आदर्श नागरी पतसंस्थे चा घोटाळा नुकताच उघड झाला असताना पुन्हा एकदा एका पतसंस्थेने ठेविदारांचे पैसे बुडवण्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला आहे. 'देवाई' नागरिक पतसंस्थेतील काही खातेदारांनी ठेवी बुडवल्याचा आरोप केल्यानंतर शहरातील सर्वच खातेदारांमध्ये खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

छत्रपती संभाजीनगरमधील सातारा देवळाई परिसरातील 'देवाई' महिला नागरिक पतसंस्थेने जवळपास दोन हजाराहून अधिक खातेदारांच्या ठेवी बुडवल्याचा प्रकरण समोर आलं आहे. गेल्या आठ दिवसापासून पतसंस्थेचे मुख्य कार्यालयाला टाळे लागले आहे.

पतसंस्थेतील ठेवीदार पैशांसाठी चपला झिझवत आहेत. संचालक महादेव काकडे फरार आहेत. तर, पाच महिन्यांपासून पगार थकल्याने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील पोलिसांत धाव घेतली आहे.

देवाई पतसंस्थेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चार शाखा आहेत. यामध्ये जवळपास तीन हजाराहून अधिक ग्राहकांनी पैसे गुंतवले वर्षाला 15 टक्के व्याज देणार असे आमिष संस्थेच्या संस्थाचालकांनी दाखवले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोणालाही पैसे परत मिळाले नाहीत.

पतसंस्थेतील खातेदारांची ठेवीची मुदत पूर्ण झाली आहे, तर काहींना आपल्या अडीअडचणीच्या काळात ठेवलेली रक्कम परत हवी होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पतसंस्थेचे शहरातील मुख्य कार्यालयाला कुलूप आहे.

तसेच संचालक मंडळातील एकाचाही फोन लागत नाहीये. यामुळे आदर्श घोटाळ्यानंतर आता दिवाळी पतसंस्थेत देखील मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता आहे.

अलीकडच्या काळात उघड होणारे घोटाळा पाहता पतसंस्था किती सुरक्षित आहेत, असा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT