Eknath Shinde orders Shiv Sena ministers to maintain silence on Manoj Jarange issue amid growing political rift. Saam Tv
महाराष्ट्र

Eknath Shinde: शिवसेनेच्या नेत्यांना मनोज जरांगेंवर बोलण्यास मनाई; गुप्त बैठकीत एकनाथ शिंदेंचा मंत्र्यांना आदेश

Maratha Reservation: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना मनोज जरंगे यांच्यावर प्रतिक्रिया देऊ नका असे निर्देश दिलेत. ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांच्याशी शीतयुद्ध सुरू असल्याची अटकळ बांधली जात आहे.

Bharat Jadhav

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांना मनोज जरांगेवर प्रतिक्रिया देऊ नका, असे आदेश दिले.

  • शिंदे आणि फडणवीस यांच्यातील शीतयुद्धाच्या चर्चांना या निर्णयाने अधिक जोर आला आहे.

  • मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करत आहेत.

महायुती सरकारमध्ये आलबेल नसल्याचं चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीत युद्ध सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांवर आरोपांवर आरोप करत आहेत. पण एकनाथ शिंदे मात्र त्यावर एकही कोणतीच प्रतिक्रिया देत नाहीयेत. त्यात आता हाती आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवेसेनेच्या नेत्यांना जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देण्यापासून रोखलंय. त्यावरुन शिंदे आणि फडणवीस यांच्यातील शीत युद्धाच्या चर्चांना पेव फुटलंय.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. मराठा आरक्षणात मुख्यमंत्री फडणवीस आडकाठी असल्याचा आरोप जरांगे मुख्यमंत्र्यांवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंना सॉफ्ट कॉर्नर दाखवत आहे. त्यात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना प्रतिक्रिया देण्यापासून रोखले आहे.

काल पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर मोठा आरोप केला होता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आरक्षणाचं काम करु न दिल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगेंनी केला होता. आता शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना जरांगेंच्या आंदोलनावर भाष्य न करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

गणेशोत्सव आणि मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांची एक गुप्त बैठक झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविषयी शिवसेनेच्या मंत्र्यांनी माध्यमांसमोर कोणतंही वक्तव्य करु नये, अशी सक्त ताकीद दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बोलताना महायुती बाबत समन्वय साधून बोलणं अपेक्षित असल्याचं देखील बैठकीमध्ये चर्चा झाली.

तसेच गणेशोत्सव काळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक या व्याख्येनुसार पक्षावाढीसाठी प्रयत्न करा, असेही निर्देश शिंदेंनी मंत्र्याना दिलेत. मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी भाजप नेते प्रयत्नशील आहेत. संधी मिळेल त्यावेळी भाजपकडून मनोज जरांगे यांच्यावर टीका केली जातेय. त्याचवेळी एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेच्या मंत्र्यांनी या मुद्द्यावर मात्र मौन बाळगल्याचं दिसून येतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dadar Tourism: दादरपासून हाकेच्या अंतरावरील hidden पर्यटनस्थळं; वन डे ट्रिपसाठी परफेक्ट प्लॅन

Maharashtra Politics: विदर्भात काँग्रेसची ताकद वाढली, माजी आमदारासह अनेक बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश

Sarva Pitru Amavasya 2025: सर्व पितृ अमावस्येला या ४ ठिकाणी लावा दिवा, लक्ष्मी अन् पितर दोन्ही होतील प्रसन्न

Maharashtra Live News Update: नांदेडच्या मुखेड शहरात भीषण अपघात, 7 ते 8 जण गंभीर

Shocking : पत्नीला अंघोळ करताना तरुणाने पाहिलं, व्हिडीओ बनवून पती विषारी औषध प्यायला अन् पुढे...

SCROLL FOR NEXT