Ladki Bahin Yojana October Installment Saam
महाराष्ट्र

लाडक्या बहिणींना भाऊबीज कधी मिळणार? ऑक्टोबर हप्त्याबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्वाची अपडेट

Ladki Bahin Yojana October Installment: एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना कायम सुरू राहिल, असं जाहीर केलं. ऑक्टोबर हप्त्याबाबत एकनाथ शिंदे यांनी मोठी अपडेट दिली आहे.

Bhagyashree Kamble

  • 'लाडकी बहीण योजना अविरत सुरू राहिल'

  • 'भाऊबीज लवकरच मिळणार'

  • ऑक्टोबर हप्त्याबाबत एकनाथ शिंदेंनी दिली मोठी अपडेट.

विधानसभा निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. या योजनेमुळे सत्ता महायुतीकडे आली. मात्र, आता या योजनेत काही बदल करण्यात येत आहे. निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येत आहे. तसेच आता ई केवायसी देखील बंधनाकारक करण्यात आलं आहे. ई केवायसी प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपात्र महिलांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता आहे. सध्या दिवाळी सुरू आहे. आज दिवाळी पाडवा. तर, उद्या भाऊबीज. ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लवकरच बंद होईल, असं वारंवार विरोधी नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, ही योजना अविरत सुरू राहिल, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 'परवापासून दिवाळीच्या पर्वाला सुरूवात झाली आहे. आज पाडवा आहे. पाडव्याच्या देखील सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवीन संकल्प, नवीन पर्व सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येवो अशा मनापासून शुभेच्छा', असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.

'बळीराजावर आलेले संकट दूर हो त्यांच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे आनंदाचे समृद्धीचे दिवस घेऊन ये', असंही एकनाथ शिंदे म्हणाले. लाडकी बहीण योजनेबाबतही एकनाथ शिंदे यांनी मोठी अपडेट दिली आहे. 'लाडक्या बहिणींना लवकरच भाऊबीज मिळणार. लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार', असं एकनाथ शिंदे म्हणाले.

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचं समोर आलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत लढवणार नाही, असं मोठं वक्तव्य काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केलं. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो आणि प्रत्येक पक्ष लोकशाहीमध्ये आपापला निर्णय घेत असतो. त्यामुळे त्यांचा तो निर्णय असू शकतो. त्यामुळे मी एवढेच सांगेल विधानसभा निवडणुकीत महायुतीनं घवघवीत यश मिळवलं. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील महायुतीच्या भगवा डोलाने फडकेल', असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! फिटमेंट फॅक्टरनुसार मिळू शकतो ₹14.10 लाखांपर्यंत एरियर, महत्त्वाची अपडेट समोर

महायुतीत पुन्हा जुंपली! भाजपने बोगस मतदानाने सत्ता मिळवली, शिंदेंच्या मंत्र्यांचा खळबळजनक आरोप, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: मनोज जरांगेंच्या आंदोलनावर सरकारची हालचाल; प्रसाद लाड यांच्याशी गंगाधर काळकुटेंची फोनवरून चर्चा

मोठी बातमी! आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियन प्रकरण CBI कडे; गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Egg freezing: करिअर की मातृत्व? नोकरदार महिलांचा ‘एग्ज फ्रिजींग’कडे वाढता कल; भविष्यातील आईपणासाठी नवा पर्याय

SCROLL FOR NEXT