Mahayuti alliance rift after Eknath Shinde absence from MMRDA programme saam tv
महाराष्ट्र

महायुतीत पुन्हा वाद? MMRDAच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदेंची दांडी; उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीनं चर्चांना उधाण

Eknath Shinde Absent From MMRDRDA Event : MMRDAच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिल्याने महायुतीतील मतभेदांच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

Bharat Jadhav

  • MMRDAच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे गैरहजर

  • शिंदेंच्या गैरहजेरीमुळे महायुतीत पुन्हा वाद

  • महायुतीतील राजकीय चर्चांना उधाण

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हं याबाबत सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आक्रमकपणे ठाकरे गटाकडून युक्तीवाद करत आहेत. सर्वोच्च न्यायालय चिन्ह आणि पक्षाबाबत काय निर्णय देणार याबाबत शिंदे गटात धाकधूक वाढलीय. त्याच दरम्यान महायुतीत वाद निर्माण झाल्याची चर्चा सुरू झालीय. त्याचं कारण ठरलंय मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा कार्यक्रम.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिल्यानं अनेकांना भुवया उंचावल्या गेल्या. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) या महत्त्वाच्या चार मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन गुरुवारी पार पडलं. मात्र, या शासकीय कार्यक्रमाच्या पत्रिकेत नाव असूनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अचानक गैरहजेरी लावल्यानं राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलंय.

एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये नगरविकास खाते सांभाळतात. विशेष म्हणजे ते एमएमआरडीएचे अध्यक्षही आहेत. असे असूनही या महत्त्वाच्या कार्यक्रमाला त्यांची गैरहजेरी अनेकांना तर्क-वितर्कांना वाव देणार ठरतेय. विशेष म्हणजे, गुरुवारीच पार पडलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या अधिकृत दौऱ्यांच्या आणि कार्यक्रमांच्या यादीत एमएमआरडीएच्या या सोहळ्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. तरीही त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण

एमएमआरडीएच्या या विशेष कार्यक्रमात चार महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. अधिकृतपणे अंधेरी पश्चिम ते मंडाले मेट्रो 2 'ब'चा (अर्थात टप्पा 1 अ) मार्गिकेतील चेंबूर मेट्रो स्थानक सुरू होतोय. हे स्थानक सुरू झाल्यामुळे प्रवशांना आता मंडाले ते चेंबूर असा थेट मेट्रो प्रवास करणे शक्य होणार आहे. या मेट्रो स्थानकाला चेंबूर येथील व्ही.एन.पुरव मार्ग शिवाय आर.सी.मार्ग जंक्शनवरील मोनोरेल स्थानकाशी पादचारी पुलाने सुद्धा जोडण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena SC Case Live : भाजपाला वेगळा अन् ठाकरेंना वेगळा न्याय?, कपिल सिब्बल यांनी दाखवली आयोगाची दुटप्पी भूमिका

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये दरड कोसळून बीएलओ गंभीर जखमी; पायावर शस्त्रक्रिया

Indian National Flag: या 4 टप्प्यात करा तिरंग्याची घडी; राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी प्रत्येकाने ही पद्धत जाणून घेणं गरजेचं

Dagdusheth Ganpati: फरासखाना, विश्रामबाग पोलिसांची जागा दगडूशेठ ट्रस्टला? पुणे पोलिसांकडून अटींसह हिरवा कंदील

घोटाळ्या प्रकरणी गिरीश महाजनांच्या नातेवाईकाला अटक; महाराष्ट्रात खळबळ

SCROLL FOR NEXT