महाराष्ट्र

Fadnavis Vs Jarange : ते हितचिंतकांचे ऐकून असं बोलतात? जरांगे पाटील यांच्या टीकेला फडणवीस यांचे प्रत्युत्तर

Bharat Jadhav

Devendra Fadnavis Comment On Manoj Jarange Patil :

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलंय.मनोज जरांगे पाटील इतर लोकांचं ऐकून बोलतात. असेच कोणी कोणाला तडीपार करत नाही. तडीपार करण्यासारखं त्यांनी काही काम केलं आहे, का त्यांच्यावर तडीपार करण्यासारखे गुन्हे आहेत असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी जरांगेंना उत्तर देताना केलाय.

मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या अंतरवली सराटीत मराठा आंदोलकाची बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यभरात मराठा आंदोलक सहभागी होतील. बैठकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटलांची नगर जिल्ह्यातील वांबोरी गावात संवाद बैठक घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती.

जरांगे पाटील यांच्या सभेची एसआयटीमार्फत चौकशी केली जाणार आहे. एसआयटी स्थापनेवर जरांगे पाटील यांनी प्रश्न उपस्थित केलाय. SIT कशासाठी असते..? माझ्याकडे काहीच नाही.जेसीबीवरून फुल उधळणाऱ्या मुलांवर गुन्हे दाखल करण्याचे काम यांनी सुरू केले आहे. गृहमंत्री साहेब मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता. आपल्या गुन्हे दाखल करून तडीपार केलं जाणार असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यावर देवेंद्र फेडणवीस यांनी उत्तर दिलंय.

मनोज जरांगे पाटील हे हितचिंतक यांचे ऐकून बोलतात. आमचे हितचिंतक भरपूर आहेत. ते त्यांच्याकडे जाऊन त्यांना फिडींग करत असतात, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. तर काही लोक वाहते गंगेत हात धुवून घेतात.त्यातून ते जरांगे पाटील यांना फिडीग करतात आणि त्यांना काहींना काही सांगत असतात. ज्या केसेस दाखल झाल्यात आहेत,त्यातील आंदोलनाच्या केसेस आम्ही मागे घेणार आहोत,यावर स्वत: मुख्यमंत्री आणि मी सुद्धा स्पष्ट केलंय.

पण ज्या ठिकाणी जाळपोळ झालीय, हिंसाचार झालाय. जे लोकं हिंसाचार करताना दिसत आहेत त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. मात्र इतर सर्व गुन्हे मागे घेतले जातील याची आम्ही घोषणा केलीय. त्यावर काम देखील सुरूये. साधरण तपासावर ४९२ केसेस आहेत. हे केसेस २४ जिल्ह्यामध्ये नोंदवण्यात आली आहेत. यात दोन जिल्ह्यांमध्ये जास्त केसेस नोंदवण्यात आली आहेत. दाखल झालेल्या गुन्ह्यांची छाननी केली जात आहे, त्यातील १७२ केसेस मागे घेण्यासंबंधी शिफारस करण्यात आल्याचं फडणवीस म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT