Ajit Pawar 
महाराष्ट्र

Ajit Pawar: पुढारी पाया पडण्याचे लायकीचे नाहीत; अजित पवारांनी नेत्यांची काढली औकात

Ajit Pawar : आपली महायुती असल्यामुळे युतीत अंतर पडेल असे काम करू नये किंवा चुकीचे वक्तव्य कुणाकडून येता कामा नये असं अजित पवार यांनी नेत्यांना कानमंत्र दिला.

Bharat Jadhav

आई-वडिलांच्या पाया पडण्या ऐवजी सध्या कोणाच्याही पाया पडण्याची एक पद्धत सुरू झालीय. अनेकजण पुढाऱ्यांच्याच पाया पडताना जास्त लोक दिसतात. पण ज्याच्या पाया पडतात ते पुढारी त्याच्या लायकीचे नाहीत, असं स्पष्ट विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. काँग्रेस सेवादलाच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्याप्रसंगी बोलताना अजित पवार यांनी हे विधान केलंय.

पक्षात येणाऱ्यांची प्रतिमा जनतेत चांगली असली पाहिजे. चुकीचे काम केलेले असेल आणि त्यावर पांघरू घालण्यासाठी कोण येत असेल तर त्यांनी प्रवेश करू नये. पक्ष प्रवेश करून चुकीवर पांघरून घातलं जाईल, असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या डोक्यातून काढून टाकावे. मी कायद्याचा आदर करतो, कायदा श्रेष्ठ आहे.चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नसल्याचं अजित पवार प्रक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी म्हणाले.

दिशाभूल करून केलेलं काम जास्त वेळ टिकत नसल्याचेही ते म्हणाले. आपण भाषणात जे काही सांगू ते कृतीत आलं पाहिजे. कारण आपण यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे आहोत, असाही सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत दायमा यांच्यासह काँग्रेस सेवा दलाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

या कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. पुढाऱ्यांचे त्यांनी कान टोचले. काम करताना चुकीचं वक्तव्य करू नये, बोलता बोलता चुकीचा शब्द बाहेर पडतो, त्यामुळे प्रॉब्लम होत असतात ते व्हायला नको. आपल्याला आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचंय. आपण शिव, शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांचे आहोत हे सांगता आलं पाहिजे, असं अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले, यापुढे सेवादलाचे काम जोमाने करायचं आहे. आजची पिढी सेवादलाकडे जात नाहीये. पण चंद्रकांत दायमा यांनी सेवादल हा आपला परिवार समजून काम केलं असल्याचं अजित पवार म्हणाले. केंद्रात स्थिर सरकार आहे. राज्यात महायुतीचे सरकार आहे. आपण लाडक्या बहिणींची चर्चा केली. काम करताना आपण पारदर्शकपणे भूमिका घेतली पाहिजे, असेही अजित पवार म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: पितृपक्ष सुरू होताच सोनं-चांदी अचानक स्वस्त! सुवर्णनगरीत मोठी घसरण; वाचा आजचे नवे दर

यायचं असेल तर आमच्यासोबत या! राष्ट्रवादी विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाताचा थरार, एकमेकांना धडक देत २ वाहने दरीत कोसळली

Women Health Tips: मैत्रीण किंवा बहिणीवर विश्वास असला तरी या ७ वस्तू कधीही शेअर करु नका; जाणून घ्या कारणं

5 Uses of Used Tea Powder: चहा केल्यानंतर उरलेली चहापावडर फेकून देताय? जाणून घ्या तिचे हे 5 जबरदस्त फायदे, घर होईल चकाचक!

SCROLL FOR NEXT