Deputy Chief Minister Ajit Pawar 
महाराष्ट्र

Ajit Pawar: मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू झालं, विमानतळावरूनच परतले अजित दादा,नेमकं काय घडलं?

Deputy Chief Minister Ajit Pawar: सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला जाता अजित पवार यांनी थेट विमानतळ गाठल्याने अनेकांच्या भुवया उंचवाल्या आहेत.

Bharat Jadhav

अभिजीत सोनवणे, साम प्रतिनिधी

शासकीय कार्यक्रमाला आलेले अजित पवार हे विमानतळावर पोहोचले. पण कार्यक्रमाला न जाता माघारी निघाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. नेमकं काय कारण आहे? अजित पवाराचं असं माघारी फिरून जाणं महायुतीत आलबेल नाहीये का असा सवाल उपस्थित होत आहे.

नेमकं काय झालं?

महायुती सरकारने नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित केला होता. सरकारमधील नेतेमंडळी कार्यक्रमाला आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील या कार्यक्रमाला जाणार होते. ठरल्यावेळेप्रमाणे अजित दादाही या कार्यक्रमासाठी पुण्याहून निघाले. अजित पवार हे हेलिकॉप्टरने पुण्याहून नाशिकला पोहोचले. यावेळी त्यांनी सध्या त्यांची ओळख बनलेलं गुलाबी जॅकेटही परिधान केलं होतं. हेलिकॉप्टरमधून नाशिकला आलेले अजित पवार विमानतळावरून तपोवन मैदानाकडे निघाले, परंतु तेथे पोहोचताच त्यांनी आपला ताफा माघारी फिरवला. त्यांनी आपला ताफा थेट विमानतळावर नेला. अजित पवार कार्यक्रमाला न जाता माघारी निघाल्याचं पाहून अनेकांच्या भुवयां उंचावल्या आहेत.

कारण काय?

लाखो लाभार्थी महिलाच्या खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत. लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय ठरलीय, पण ज्या सरकारने ही योजना आणली त्या सरकारमध्ये मात्र आलबेल नसल्याचं दिसतंय. नाशिकमध्ये या योजनेचा शासकीय कार्यक्रमाकडे अजित पवारांनी पाठ फिरवली. महायुतीकडून नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आोयजित करण्यात आला होता.उपमुख्यमंत्री अजित वार देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र कार्यक्रमाला पोहोचण्याआधीच ते माघारी परतले.

नाशिकच्या तपोवन मैदानापर्यंत अजित पवार पोहोचले होते. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू झाल्याचं समजताच अजित पवार यांनी व्यासपीठावर न येता वाहनांचा ताफा थेट विमानतळाकडे वळवला. अजित पवार पुण्याहून नाशिकला याच कार्यक्रमासाठी आले होते, मात्र कार्यक्रमाला वेळेत न पोहोचल्याने माघारी गेल्याचं सांगितलं जात आहे. मात्र कार्यक्रम स्थळापासून माघारी फिरल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. विशेष म्हणजे या योजनेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही योजने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी महायुती सरकार जागोजागी शासकीय कार्यक्रम घेऊन या योजनेची माहिती देत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Shirala Chutney Recipe : शिराळ्याची चटणी कधी खाल्ली आहात का? हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला उत्तम

Pune : पुण्यात शरद पवारांना जबरी धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात प्रवेश करणार, २२ नेते आज कमळ हातात घेणार

Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आमिर खानच्या सिनेमात वर्णी

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

SCROLL FOR NEXT