Head-on collision between bike and Ertiga in Deola Nashik saam tv
महाराष्ट्र

Nashik: देवळा-मालेगाव रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू, कारचालक फरार

Deola Malegaon Road Accident Two Killed Bike Car Crash: नाशिकच्या देवळा तालुक्यात देवळा-मालेगाव रोडवर दुचाकी आणि इर्टिगा कारमध्ये समोरासमोर भीषण धडक होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

अजय सोनवणे, साम टीव्ही

नाशिक: जिल्ह्यातील देवळा तालुक्यामधील पिंपळगाव वाखरी शिवारात देवळा-मालेगाव रोडवर झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मोटारसायकल आणि कार यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत हा अपघात झाला. अपघातानंतर चारचाकी वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी सुमारे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून देविदास पांडुरंग देवरे (वय 26) आणि कैलाश पुंडलिक देवरे (वय 55) दोघेही रा.धोबीघाट, दहिवड (ता. देवळा) हे मोटारसायकलवरून दहिवडकडून देवळ्याकडे जात होते. त्याचवेळी देवळ्याकडून दहिवडकडे जाणाऱ्या कारने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत मोटारसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचा चालक वाहन घटनास्थळीच सोडून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात हलवले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळे- पावसाअभावी करपलेली पिके घेऊन शिंदे गट धडकला तहसील कार्यालयात

Shocking: मध्यरात्री भयंकर घडलं! ड्युटीवर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला जागीच संपवलं, नेमकं काय घडलं?

Vastu Tips For Money: कपाटात पैसे ठेवण्याविषयीच्या 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Health Tips: डायबिटीजसाठी कारलेच नाही, 'या' ५ भाज्याही गुणकारी, साखर राहील कंट्रोलमध्ये

Eye Care Tips: चष्म्याचा नंबर वारंवार वाढतोय? रोज करा 'हे' ७ सोपे उपाय; नजर राहील तीक्ष्ण

SCROLL FOR NEXT