अमरावतीच्या तिवसा शहरात डेंग्यूचे तांडव; बालकांना जास्त धोका Saam Tv
महाराष्ट्र

अमरावतीच्या तिवसा शहरात डेंग्यूचे तांडव; बालकांना जास्त धोका

अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात गेल्या सहा दिवसात तीन बालकांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

अरुण जोशी

अमरावती जिल्ह्यातील (Amravati District) तिवसा शहरात गेल्या सहा दिवसात तीन बालकांचा डेंग्यूने (Dengue) मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यात लहान बालकांना सर्वाधिक डेंग्यूने ग्रासलं आहे. तिवसा येथील देवांश वाट वय १८, अजय रेवतकर वय ८ वर्ष व कृष्णा देशमुख वय १३ वर्ष या तीन बालकांचा सहा दिवसात डेंग्यूने मृत्यू झाला आहे.

तिवसा ग्रामीण रुग्णालयात महिनाभरात ४० रुग्ण डेंग्यू सदृश्य आढळून आले आहेत, तसेच अचलपूर व परतवाडा या जुळ्या शहरात २० दिवसापासून डेंग्यूचे मोठं तांडव सुरू आहे. या ठिकाणी २५० रुग्ण डेंग्यू सदृश्य आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. येथे दहा डेंग्यू टेस्ट मध्ये सात डेंग्यू पॉझिटिव्ह निघत असल्याने आता कोरोना नंतर हे नवीन संकट अमरावतीत निर्माण झाले आहे.

तिवसा शहरात ठीक ठिकाणी पाणी साचलं असून दूषित व नियमित पाणी पुरवठा होत नाही तसेच फवारणी नियमित केली जात नाही असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय, तिवसा तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर बालकांंना डेंगूची लागण होत असल्याने बालकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे त्यामुळे प्रशासनाचे लक्ष देण्याची गरज आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Rings Designs : हातांच्या सौंदर्यात पडेल भर! घागरा चोळीवर खुलून दिसतील 'या' ७ स्टायलिश रिंग्स

Hair Care: केस लगेच फ्रिझी होतात? मग वापरा या ७ सोप्या टिप्स; केस होतील मऊ, मुलायम आणि चमकदार

Maharashtra News Live Update : महायुतीत एकनाथ शिंदे पुन्हा नाराज

DA Hike Calculation: DA वर आयकर लागतो का? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Property News: अनधिकृत बांधकामांवर फडणवीस सरकारचा मोठा प्रहार; घेतला मोठा निर्णय, नियम मोडणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई

SCROLL FOR NEXT