नाशकात कोरोनानंतर आता डेंग्यू आणि चिकन गुनियाचं थैमान Saam Tv
महाराष्ट्र

नाशकात कोरोनानंतर आता डेंग्यू आणि चिकन गुनियाचं थैमान

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील (Corona Second Wave) रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असतांनाचं आता नाशकात डेंग्यू आणि चिकन गुनियाचं थैमान पाहायला मिळत आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील (Corona Second Wave) रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असतांनाचं आता नाशकात डेंग्यू आणि चिकन गुनियाचं थैमान पाहायला मिळत आहे. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यातचं डेंग्यूचे शंभरहून अधिक रूग्ण आढळून आले आहेत, तर चिकनगुनियचेही 78 रूग्ण आढळून आले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या पावणे चारशेवर गेली आहे, तर चिकन गुनियाच्या रुग्णांची संख्या तीनशेच्या वर पोहचलीय.

त्यामुळे आरोग्य यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यू आणि चिकन गुनियाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालिकेकडून धूर आणि औषध फवारणी केली जाते, जनजागृती करण्यात येते. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजनांनंतरही रुग्णसंख्या वाढत असल्यानं पालिकेच्या धूर आणि औषध फवारणीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

शहरातील वेगवेगळ्या भागात नव्यानं डेंग्यू आणि चिकन गुनियाचे रूग्ण आढळून येत असतांनाही आरोग्य विभाग सुस्तच असून नोंदणी न झालेल्या आणि खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक लॅबकडून डेंग्यू आणि चिकन गुनियाच्या रुग्णांचे रिपोर्ट पालिकेकडे कळवण्यात यावेत, यासाठी पालिका आयुक्तांनी संबंधित यंत्रणांना आदेश दिले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT