Satara News Saam Tv
महाराष्ट्र

मनोरुग्ण वैद्यकीय अधिकाऱ्याकडून प्राथमिक आरोग्य केंद्राची तोडफोड

कोयना पोलीसात गुन्हा दाखल, मनोरुग्ण वैद्यकीय अधिकाऱ्याला पोलीसांनी घेतले ताब्यात...

ओंकार कदम

सातारा - कोयना विभागातील हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रांत निवासी वैद्यकीय आधिकारी या पदावर काम करणाऱ्या डॉ. सुप्रीम कांबळे यांनी हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. हा वैद्यकीय अधिकारी मनोरुग्ण आहे. त्याला आलेल्या झटक्याने त्याने हे कृत्य केले असल्याची तक्रार तालुका वैद्यकीय आधिकारी प्रमोद खराडेव वैद्यकीय आधिकारी इंदीरा भिंगारदिवे यांनी कोयना पोलिसात दाखल केली आहे.

हे देखील पहा -

हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रांत दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. निवासी वैद्यकीय आधिकारी या पदावर कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी हे गत चार महिन्यापासून मनोरुग्ण बनले आहेत. त्यांना सतत येणाऱ्या वेडाच्या झटक्यातून त्यांच्या कडून नेहमीच चुकीच्या घटना घडत आहेत.२९ मार्च रोजी रात्री आलेल्या वेडा च्या झटक्यातून मनोरुग्ण वैद्यकीय अधिकाऱ्याने हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रा ची इमारत तोडफोड करून धिंगाणा घातला आहे.यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचारासाठी दाखल असणाऱ्या रुग्णात घबराट पसरली.

या घटनेची तक्रार तालुका वैद्यकीय अधिकारी प्रमोद खराडे व वैद्यकीय आधिकारी इंदिरा भिंगारदिवे यांनी कोयना पोलीसात दाखल केली आहे. कोयना पोलीसांनी मनोरुग्ण वैद्यकीय अधिकारी सुप्रिम कांबळे याला ताब्यात घेतले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महावितरणला अदानी पॉवरकडून स्वस्त वीज खरेदीस एमईआरसीची मंजुरी

Shocking : खळबळजनक! प्रेमसंबंधात पतीचा अडथळा, बॉयफ्रेंडच्या मदतीने पत्नीने काढला काटा

मुंबईकरांसाठी खूशखबर! मध्य रेल्वेवर धावणार १२ नव्या AC लोकल; वेळापत्रक पाहिलेत का?

नाश्त्याला रव्यापासून बनवा हेल्दी आणि टेस्टी 5 पदार्थ, न खाणारेही खातच राहतील

Thane Fort : सह्याद्रीच्या उंच शिखरावर वसलेला किल्ला, ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे 'हे' ऐतिहासिक ठिकाण

SCROLL FOR NEXT