vinayak raut 
महाराष्ट्र

काेकणवासीयांसाठी खासदार राऊतांची गणरायाच्या चरणी 'प्रार्थना'!

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : गणेशोत्सवासाठी यावर्षी फार माेठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येणार आहेत. त्या सर्वांनी यावे, शांततेत उत्सव साजरा करावा. काेकणवासियांनी kokan शासनाच्या नियमानुसार गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवाच्या ganesh festival 2021 अनुषंगाने राज्य शासनाने सूचना दिलेल्या आहेत. त्याचे पालन करावे असे आवाहन खासदार राऊत यांनी येथे केले. राज्य शासन गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना जाणुन -बुजून अडी अडचणी निर्माण करणार नाही असे खासदार राऊत vinayak raut यांनी स्पष्ट केले.

काेकणात डेल्टा पल्सचे रुग्ण वाढताहेत यामुळे सणांवर निर्बंध येणार का? राज्य सरकार काही विशेष नियम लावणार का? आदी प्रश्नांची उत्तर खासदार विनायक राऊत यांनी येथे दिली.

कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात आत्तापर्यंत (ता. १६) १५ काेविड रुग्ण (डेल्टा प्लस व्हेरिअंट) आढळले आहेत. हे सर्व रुग्ण संगमेश्वर तालुक्यातील आहेत. त्यापैकी दाेघांचा मृत्यू झाला आहे. त्यापार्श्वभुमीवर प्रशासन काळजी घेत आहे. याबाबत खासदार विनायक राऊत यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला.

ते म्हणाले काेविडचा प्रादुर्भाव वाढत आहे हे खरं आहे. गणरायाच्या चरणी मी देखील प्रार्थना करताे. येथे काेविडची गंभीर परिस्थिती उदभवू नये, तुझ्या भक्तांना काेकणात येऊ देत. येथे त्यांना पूजा अर्चा करु देत. देवदर्शन घेऊ देत आणि पुन्हा मार्गस्थ हाेऊ देत. कोकणवासीयांना उत्सवासाठी काेणत्याही अडी अडचण निर्माण हाेतील असे राज्य शासन जाणुन-बुजून करणार नाही असा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Crop : धुक्यामुळे कांदा पिक धोक्यात; रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल

VBA News : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध! पाहा नेमकं काय आहे जाहीरनाम्यात | Video

Sneeze: शिंकताना डोळे का बंद होतात? जाणून घ्या एका क्लिकवर

Crime News : ३-३ गर्लफ्रेंड, महागडं गिफ्ट द्यायचं होतं; पठ्ठ्या थेट बँक लुटायला गेला, पण सगळा घोळ झाला!

Maharashtra News Live Updates: बारामतीत भाजपला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT