delta plus 
महाराष्ट्र

अडीच महिन्यानंतर समजले डेल्टा प्लस झाल्याचे; प्रशासन सतर्क

संभाजी थोरात

कोल्हापूर : राज्यात डेल्टा प्लसचे delta plus रुग्ण वाढल्याची माहिती नुकतीच राज्याचे आराेग्यमंत्री राजेश टाेपे rajesh tope यांनी दिली. त्यावेळी काेणत्या जिल्ह्यात किती रुग्ण संख्या आहे हे त्यांनी सांगितले. जळगाव, बीड प्रमाणे आता काेल्हापूरात देखील डेल्टा प्लसचा एक रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. संबंधित रुग्ण हा सुरक्षीत आहे. त्याचे लसीकरणाचे दाेन डाेस पुर्ण झाले आहेत अशी माहिती महापालिकेतून देण्यात आली. दरम्यान संशयितांचे अहवाल विलंबाने प्राप्त हाेत असल्याने हा प्रकार जीवघेणा ठरु शकताे. यामुळे आराेग्य यंत्रणेने त्याकडे तातडीने लक्ष देणं महत्वाचे ठरणार आहे.

काेल्हापूर जिल्ह्यात डेल्टा प्लसचा एक रुग्ण आढळला आहे. त्याबाबतचा अहवाल आठ ऑगस्टला प्राप्त झाला. खरं तर संबंधित रुग्ण हा अडीच महिन्यांपुर्वीच आढळला हाेता. परंतु त्याचा अहवाल आठ ऑगस्टला मिळाला. या दिरंगाईस काेण जबाबदार असा प्रश्न निर्माण हाेत आहे. दरम्यान काेल्हापूर महापालिकेने तातडीने संबंधित रुग्णाच्या संपर्कातील लाेकांची गाठ भेट घेवून त्यांची स्थिती जाणून घेतली.

लसीकरणाचे दोन डोस झाल्यानंतर देखील ज्यांना काेविड १९ ची लागण झाली अशा नागरिकांची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. काेविड १९ चा कोणता विषाणू आढळून आला यासाठी ही फेरतपासणी केली जाणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

SCROLL FOR NEXT