Delhi Blast Saam Tv
महाराष्ट्र

Delhi Blast Update : बहि‍णीकडे जातो म्हणून निघाला अन् दिल्लीत पोहचला, बॉम्बस्फोटावेळी मशिदीत मुक्काम, अकोल्यात येताच....

Akola youth questioned in the Delhi blast case : दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील एका तरुणाची तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली. तो दिल्लीतील निजामुद्दीन मशिदीत मुक्कामाला होता. पोलिसांनी सीडीआरसह सर्व तपास केले असले तरी कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.

Namdeo Kumbhar

  • दिल्ली स्फोटाच्या दिवशी अकोल्यातील तरुण दिल्लीमध्ये असल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

  • तब्बल 7 तास चौकशी करूनही तरुणाविरुद्ध कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही.

  • युवक दिल्लीतील निजामुद्दीन मशिदीत मुक्कामाला होता.

  • पोलिसांचा संशय कायम असून सीडीआर आणि इतर तांत्रिक तपास सुरूच आहे.

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Details of Akola youth staying in Nizamuddin mosque during the Delhi explosion : दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील एका मुस्लिम तरुणाची अकोला पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. हा युवक अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावातला रहिवाशी आहे. युवक बेपत्ता असल्याची कुटुंबियांची तक्रार पिंजर पोलिसांत होती. दिल्लीत बॉम्बस्फोट झाला त्या दिवशी हा युवक दिल्लीतच असल्याची माहिती होती. पोलिसांनी या तरुणाच्या कारवायांवर लक्ष ठेवत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होत.

तब्बल 7 तास पोलिसांकडून या तरुणाची चौकशी झाली. या संशयीत तरुणांच्या चौकशीतून काही विशेष बाबी समोर न आल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांनी संशयित तरुणाची सीडीआर आणि इतर गोष्टींची कसून चौकशी सुरू आहे या तरुणावर पोलिसांचा संशय असल्याने त्याच्याबद्दल आधीपासूनच अकोला पोलीस सतर्क होते. मात्र आतापर्यंतच्या चौकशीत सदर तरुणाबद्दल कोणतीच पुरावे हाती न लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील 19 ते 20 वर्षीय वयोगटातील एका तरुणाची अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि पिंजर पोलिसांकडून चौकशी झाली. जवळपास 7 तास या तरुणाची चौकशी करण्यात आली. हा तरुण 7 नोव्हेंबर रोजी बेपत्ता असल्याची तक्रार पिंजर पोलीस ठाण्यात दाखल होती. या तरुणाचा शोध सुरू असतानाच पोलिसांना तो दिल्लीत असल्याची माहिती लागली. दरम्यान, तो दिल्लीत असतानाच त्याच कालावधीत दिल्लीत ब्लास्ट झाला होता. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय झाला. त्यानंतर अकोला पोलीस अधीक्षकांसह पिंजर पोलिसांनी त्याला ठाण्यात आणला आणि चौकशी सुरू केली. चौकशीअंती तरुणाला काही तासानंतर सोडून देण्यात आले.

दरम्यान, मुस्लिम तरुण हा बहि‍णीकडे जातो म्हणून घरून निघून गेला होता. त्यानंतर तो बहिणीकडे पोहोचलाच नाही. दिल्लीतील मदरसामध्ये राहणाऱ्या दोन तरुणाची त्याची ओळख झाली होती, याच ठिकाणी दिल्लीतील निजामुद्दीन मज्जिदमध्ये त्याचा मुक्काम होता. मित्रांसोबत फिरण्यासाठी तो दिल्लीत गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली. तरीही पोलिसांना या तरुणावर संशय असून त्याच्यावर नजर आहे.. सद्यस्थितीत तरुणाला सोडून देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chinese Chutney: मंच्युरियनची तिखट लाल चटणी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरातील एका इमारतीजवळ खून

Leopard Safety: बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये वाढ; बचावासाठी 'या' टिप्स लक्षात ठेवा

Face Care: चेहरा सॉफ्ट आणि ग्लोईंग पाहिजे, तर रोज सकाळी 'हे' फेस सीरम चेहरावर नक्की लावा

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

SCROLL FOR NEXT