मतमोजणी file photo
महाराष्ट्र

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक; उद्या मतमोजणी

संपूर्ण राज्याचे निवडणूक निकालाकडे लक्ष लागले आहे. कांग्रेस चे जितेश अंतापूरकर, भाजपचे सुभाष साबणे, वंचितचे डॉ.उत्तम इंगोले या तीन प्रमुख उमेदवारांसह 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : कांग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या देगलूर-बिलोली विधासभा पोट निवडणूकीची उद्या मतमोजणी होणार आहे. देगलूर च्या पंचायत समितीच्या सभागृहात मत मोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात होणार आहे.

हे देखील पहा :

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे संपूर्ण राज्याचे निवडणूक निकालाकडे लक्ष लागले आहे. कांग्रेस चे जितेश अंतापूरकर, भाजपचे सुभाष साबणे, वंचितचे डॉ.उत्तम इंगोले या तीन प्रमुख उमेदवारांसह 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

30 ऑक्टोबर रोजी तीन लाख मतदारांपैकी 63.94 टक्के मतदान झाले. या निवडणुकीत भाजपने ही तगडी प्रचार यंत्रणा उभारुन निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण केली. आता कोण बाजी मारणार याकडे मतदारांत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule News : कचरा संकलन करणाऱ्या गाडीने बालकास चिरडले; धुळे शहरातील धक्कादायक घटना

Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाचा त्याग करणार नाही, भाजप आमदार आक्रमक

Maharashtra News Live Updates: दिलीप वळसे पाटील देवगिरीवर अजित पवारांच्या भेटीला

Makeup Tips: मेकअप ब्रशचे किती प्रकार असतात? जाणून घ्या, ते कसे वापरायचे

Ajinkya Rahane: KKR ने 'या' तीन खेळाडूंची लाज वाचवली? अखेरच्या क्षणाला अजिंक्य रहाणेसोबत 'या' खेळाडूंना घेतलं ताफ्यात

SCROLL FOR NEXT