फडके रोडवर गर्दी करू नका, अन्यथा पोलीस करणार कारवाई!

डोंबिवली शहरात पोलिसांनी बॅनर लावले आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की दिवाळी निमित्ताने फडके रोड येथे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.
फडके रोडवर गर्दी करू नका, अन्यथा पोलीस करणार कारवाई!
फडके रोडवर गर्दी करू नका, अन्यथा पोलीस करणार कारवाई!प्रदीप भणगे
Published On

डोंबिवली : डोंबिवलीत दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपले आप्त, मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी पहाटेपासून तरूण, तरूणी डोंबिवलीच्या फडके रोडवर, टिळक रोड आणि परिसरात जमत असतात. तसेच दिवाळी पहाट कार्यक्रम होत असतात. मात्र, यावर्षीही हे करताना येणार नाही. असे आदेशच पोलिसांनी काढले आहेत. याबाबत डोंबिवली शहरात पोलिसांनी बॅनर लावले आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की दिवाळी निमित्ताने फडके रोड येथे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.

हे देखील पहा :

दिपावलीच्या दिवशी नेहरु रोड, फडके रोड तसेच डोंबिवली शहराच्या अन्य ठिकाणी एकत्रपणे गर्दी करुन जमु नका. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरुन तसेच, सामाजिक अंतर राखुन रोगाचा प्रादुर्भाव टाळा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तर सीआरपीसी कलम १४४ लागू असून जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. आदेशाचे उलंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

आदेशाचे पोलिसांनी लावले डोंबिवलीत बॅनर, बॅनरवर काय म्हटले आहे पहा....

डोंबिवली शहरातील समस्त नागरिकांना कळविण्यात येते की, मार्च २०२० पासून आपण सर्वजण कोव्हीड १९ या रोगाशी समर्थपणे मुकाबला करीत दैनंदीन जीवन जगत आहोत. दिवाळी पहाटच्या निमित्ताने फडके रोड येथे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. दिपावली पुर्वी खरेदीसाठी तसेच दिपावलीच्या दिवशी नेहरु रोड, फडके रोड तसेच डोंबिवली शहराच्या अन्य ठिकाणी एकत्रपणे गर्दी करुन जमु नका, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरुन तसेच, सामाजिक अंतर राखुन रोगाचा प्रादुर्भाव टाळा.

फडके रोडवर गर्दी करू नका, अन्यथा पोलीस करणार कारवाई!
नगरमध्ये विवाहितेवर दोनदा सामूहिक बलात्कार!

पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचे आदेशानुसार आयुक्तालयात सीआरपीसी कलम १४४ प्रमाणे लागू असुन जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. सदर मनाई आदेशाचे उलंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. कृपया यंदाचा दिवाळी सण हा आपण सर्वांनी कोव्हीड १९ चे नियमांचे पालन करुन पोलीसांना सहकार्य करा. आपण सर्वांना दिवाळी सुखसमाधानाची व आरोग्यदायी जावे हिच सदिच्छा.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com