Sanjay Gaikwad’s luxury Defender SUV sparks political storm in Maharashtra; questions arise over ownership and alliances. saam tv
महाराष्ट्र

Sanjay Gaikwad: डिफेंडरवरुन महायुतीत नवा बवंडर? संजय गायकवाडांना कुणी घेरलंय?

Sanjay Gaikwad Defender Car Controversy: आता नेत्यांना भुरळ पाडणाऱ्या दीड कोटीच्या डिफेंडरवरुन महाराष्ट्रात नवा बवंडर सुरुय. डिफेंडरच्या आडून गायकवाडांना कुणी घेरलंय? नेत्यांच्या गाड्या कंत्राटदार आणि नातेवाईकांच्या नावावर असण्यामागे नेमकं काय गणित आहे? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

  • दीड कोटींच्या डिफेंडर गाडीवरुन नवा वाद सुरू

  • गाडी कंत्राटदार किंवा नातेवाईकांच्या नावावर

  • या प्रकरणामुळे महायुतीत नवा बवंडर आणि राजकीय तणाव

बुलढाण्यात डिफेंरवरुन महायुतीत नवं वादळ उठलंय. शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाडांकडील डिफेंडर गाडी कोणत्या कामाच्या कमिशनमधून मिळाली, असा सवाल करत भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदेंनी गायकवाडांना घेरलंय. तर ती गाडी नातेवाईक असलेल्या कंत्राटदाराच्या नावावर असल्याची कबुलीच संजय गायकवाडांनी दिलीय.

खरंतर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांनी विजयराज शिंदेंवर दीड कोटीच्या डिफेंडरचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देतांना विजयराज शिंदेंनी गायकवाडांची नाकेबंदी केलीय. आता फक्त संजय गायकवाडच नाही तर मंत्री संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरेंच्या डिफेंडर गाड्यांवरुनही अंबादास दानवेंनी सवाल उपस्थित केलाय..

अंबादास दानवेंच्या आरोपानंतर साम टीव्हीने मंत्री संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरे वापरत असलेल्या डिफेंडर गाड्या कुणाच्या नावावर आहेत? त्याची माहिती घेतली. हा फोटो पाहा. मंत्री संजय शिरसाट वापरत असलेली ही आहे MH 20 GE 0001 डिफेंडर गाडी.ही गाडी सागर पवार यांच्या नावावर असल्याचं आढळून आलंय.

तर संदीपान भुमरे वापरत असलेली डिफेंडर गाडी MH 20 GK 0009 संजय भंडारी नावाच्या व्यक्तीच्या नावावर आहे. त्यामुळे आता आमदार, खासदार आणि मंत्री वापरत असलेल्या गाड्या जर नातेवाईक आणि कंत्राटदारांच्या नावावर असतील तर त्यामागे कुठली आर्थिक देवाण घेवाण दडलीय का? याचा शोध घेण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Summer: उन्हाच्या कडाक्यात चेहऱ्याला लावू नका या गोष्टी, डॉक्टरांनी दिल्या टिप्स

Kalyan : कल्याणमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, डॉक्टरचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update : वर्ध्यातील बोर व्याघ्र प्रकल्पला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद

Maharashtra Politics: राहुरीत राजकीय घडामोडींना वेग, भाजप उमेदवाराच्या विरोधात माजी मंत्री रिंगणात

Late periods causes: मार्च महिन्यात मासिक पाळी का येते उशीरा? डॉक्टरांनी सांगितलं यामागील कारण

SCROLL FOR NEXT